झरेकाठी सोमनाथ डोळे राहुरी परिसरातील वाहतुकीसाठी महत्त्वाचा असलेल्या नगर–मनमाड महामार्गावरील भुजाडी पेट्रोल पंप ते राहुरी महाविद्यालय या दरम्यानच्या रस्त्याचे काम अखेर युवानेते डॉ.सुजय विखे यांच्या प्रयत्नातून पूर्ण झाले असून येथील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.
आता हा टप्पा लवकरच नागरिकांच्या सेवेत खुला होणार असून, परिसरातील वाहतूक अधिक सुलभ व वेगवान होणार आहे महाविद्यालयीन विद्यार्थी आणि इतर पादचारी यांना हा रस्ता सोईचा असल्याने डॉ.विखे यांनी या रस्त्याच्या कामाकडे सजगतेने लक्ष दिले आणि लवकरात लवकर हे काम मार्गी लावले त्याबद्दल डॉ.विखे यांची कृतज्ञता व्यक्त होत आहे
