नाशिक दिनकर गायकवाड घराजवळ उभ्या असलेल्या महिलेचा हात धरून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
छाया रेखांकन-प्रकाश कदम
फिर्यादी महिला ही फुलेनगर येथे भराडवाडी परिसरात घराजवळ उभी होती. त्यावेळी आरोपी अशोक शिंदे (रा. भराडवाडी) हा तेथे आला. त्याने पीडितेचा हात पकडून स्त्रीमनास लज्जा उत्पन्न होईल,असे कृत्य करून तिच्याशी बळजबरी करू लागला. पीडितेने रमे त्याला विरोध केला असता शिंदे याने पीडितेला मारहाण केली, तसेच "तू माझी तक्रार कोणाकडेही केली, तरी मी पैसे भरून मॅनेज करून घेईन," अशी दमदाटी केली.या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात अशोक शिंदे याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
