उपतालुकाप्रमुख प्रमुख सचिन साळवे यांचा युवासेना पदाचा तात्काळ राजीनामा
संगमनेर प्नतिनिधी अंतर्गत कूरघोडी राजकारणा कंटाळून वैयक्तिक कारण देत संगमनेरचे येथील उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना गटाच्या युवासेनेचे तालुका उपप्रमुख सचिन पावलस साळवे, यांनी नुकताच आपल्या पदाचा राजीनामा वरिष्ठांना सादर केला आहे.या राजीनामा नंतर संगमनेरात राजकीय चर्चाला सुरुवात झाली उबाठा गटाला गळती लागली आहे.
राजीनामा पत्रात सचिन साळवे म्हणाले की गेली अनेक वर्षे युवासेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे),शिवसेना या पक्षाचे कार्य करत आहे. या काळात काम करत असताना पक्षातील अनेक चढ-उतार त्यांनी पाहिले आहेत.विविध विषयांवर न्याय मिळवण्यासाठी अनेकदा रस्त्यावर उतरून आंदोलनांत सहभाग घेतला आहे. त्या आंदोलनांमुळे त्यांच्यावर काही खटले सुद्धा दाखल झाले आहेत.
या काळात पक्षातील सर्व नेते, कार्यकर्ते माझ्या सुख-दुःखात सहभागी होते,याबद्दल मी त्यांचा मनापासून ऋणी आहे.परंतु, गेल्या काही दिवसांपासून कौटुंबिक कारणास्तव मला पक्षाच्या कामासाठी पुरेसा वेळ देणे शक्य होत नाही. त्यामुळे मी माझ्या युवासेना उपतालुका प्रमुख या पदाचा राजीनामा स्वखुशीने,कोणत्याही दबावाखाली न येता देत आहे.
सचिन साळवे हे कौटुंबिक कारणे देऊन जरी राजीनामा देत असले तरी कुरघोडीची धुसफुस सुरू आहे अशी माध्यमात चर्चा आहे.
