जनतेच्या ज्वलंत विविध नागरी समस्या आणी प्रश्नांसाठी समाजवादी कटिबद्ध- जोएफ जमादार
श्रीरामपूर दिपक कदम शहरातील समस्त जनतेच्या विविध ज्वलंत प्रश्न आणी समस्यांबरोबरच विकासाचा मुद्दा घेऊन श्रीरामपूर नगर पालिका निवडणुकीत समाजवादी पार्टी पुर्ण ताकदीनिशी मैदानात उतरली असुन नगराध्यक्ष पदासह नगरसेवक पदासाठी विविध प्रभागात उमेदवार रिंगणात उतरणार असल्याने समाजवादी पक्षाच्या सर्व उमेदवारांच्या सायकल या निशाणी समोरील बटन दाबून सर्वच्या सर्व स.पा.उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करा असे आवाहन प्रदेशाध्यक्ष आ.आबु आझमी यांनी केले.
पक्षाचे जिल्हाध्यक्ष जोएफ जमादार यांनी आ.आझमी यांची नुकतीच मुंबई स.पा. प्रदेश कार्यालयात त्यांची भेट घेतली यावेळी ते बोलत होते.या प्रसंगी श्रीरामपूर शहरातील समस्त जनतेच्या ज्वलंत विविध नागरी समस्या आणी जटील प्रश्नांसोबत विकासाबाबत समाजवादी पार्टी कटिबद्ध असल्याचे जिल्हाध्यक्ष जोएफ जमादार यांनी सांगितले.
प्रसंगी श्रीरामपूर येथील जनतेच्या ज्वलंत विविध नागरी समस्या आणि प्रश्नांसाठी समाजवादी आपण नियमित कटिबद्ध राहू असे इच्छुक उमेदवार जोएफ जमादार म्हणाले.
