नागरिकांचे राहुरी तहसीलदारांना निवेदन
म्हैसगांव कमलेश विधाटे अहिल्यानगर जिल्हातील अनेक गावे पोलिस पाटील पदापासून पासुन वचिंत आहे रिक्त गावांचे पोलिस पाटील भरती तातडीने करावी अशी मागणी ग्रामस्थांनी नुकतेच राहुरी तहसीलदारांना आपल्या मागणीचे निवेदन देऊन केली.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की गावांमध्ये प्रशासनासह पोलिस यंत्रणेचा दुवा म्हणून गावामध्ये पोलिस पाटील काम करत असतात गावासाठी अत्यंत महत्वाचे असलेले पोलिस पाटील पद गेल्या किमान काही वर्षांपासून रिक्त आहे.या मुळे यंत्रणेच्या कामकाजावर परिणाम होत असल्याचे वास्तव आहे.
गावात एखादी संशयास्पद व्यक्ती आल्यास पोलिसांना तात्काळ कळवणे, चोरी,मारामारी,खून, दंगल यासारख्या गुन्ह्यांची माहिती पोलिसांना देणे,पूर, आगीसारख्या नैसर्गिक आपत्तींमध्ये मदत आणि बचावकार्य करणे,गावकऱ्यांना आपत्तीविषयी सतर्क करणे आणि मदत पुरवणे यासोबतच स्थानिक वाद सोडवणे यासह अनेक कार्य पोलिस पाटील करतात.गावासाठी अत्यंत महत्वाचे असलेले पोलिस पाटील पद रिक्त असल्यामुळे गावातील नागरिकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे कायदा सुव्यवस्थळेचे प्रश्न वाढत चालल आहेत.विविध कारणांकरिता लागणारी शिफारस घेण्याकरिता ८ ते १० कि.मी अंतर जाऊन शिफारस घ्यावी लागत असल्याने नागरिकांना प्रचंड वेळ वाया जाऊन आर्थिक,मानसिक व शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागते.
भरती प्रक्रिया तातडीने राबवावी म्हणून आम्ही या अगोदर आपले कार्यलयास व शासनास निवेदने दिले आहे.आपले मार्फत जानेवारी ते मार्च दरम्यान प्रक्रिया सुरू असल्याचे समजले. लोकसंख्येच्या टक्केवारी नुसार आरक्षण निश्चितिची कार्यवाही देखील आपण पूर्ण करवून ८ महिने झाले आहेत.
परंतु प्रचंड संथ गतीने सुरू असलेल्या प्रक्रियेबद्दल नागरिकांच्या मनात साशंकता निर्माण झाली आहे. पोलिस पदासाठी इतर जिल्ह्यात भरती प्रक्रिया सुरू झाली असल्याचे समजते.
तरी, आपल्या जिल्ह्यात पोलिस पाटील भरती प्रक्रिया सन २०२५-२०२६, तातडीने पूर्ण करण्यात यावी.या मागणीचे निवेदन तहसीलदार राहुरी यांना देण्यात आले आहे.
प्रसंगी निवेदन सादर करताना कोळेवाडी ग्रामपंचायतचे सरपंच डॉ जालिंदर घिगे ,श्रमिक लोकशाहीचाचे संदीप कोकाटे . श्रीराम विधाटे,कुमार भिंगारे, तावजी केदार,संदीप गवळी, अनिल विधाते,सुनील वायळ , दत्तात्रय पिंपळे, व यांच्या निवेदनावर सह्या असून संजय गागरे,अशोक नेहे,चंद्रकांत जाधव,कृष्णा माळी आदी उपस्थित होते.
