नाशिक दिनकर गायकवाड - राज्य शासनाच्या सेवेतील नाशिक विभागातील लिपिकवर्गीय गट 'क कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण विभागीय सहसंचालक, लेखा व कोशागारे,नाशिक विभाग, नाशिक यांच्यामार्फत प्रशिक्षण सत्र १०६ हे २३ सप्टेंबर ते ९ डिसेंबर २०२५ या कालावधीत सुरू आहे.
या अंतर्गत कर्मचाऱ्यांच्या कामाची निकड लक्षात घेऊन २४ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर २०२५ या कालवाधीत मॉड्यूल क्रमाक ५ 'ई-गव्हर्नन्स' या विषयावर प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. नाशिक विभागातील सर्व शासकीय कार्यालयीन प्रमुखांना त्यांच्याकडील लिपिकवर्गीय कर्मचारी यांना प्रपत्र (अ) शिफारशीसह प्रशिक्षणासाठी पाठविण्याचे आवाहन प्रशिक्षण लेखा व कोषागारे, नाशिक विभागाचे सहाय्यक संचालक माधव थैल यांनी केले आहे.
प्रशिक्षण घेत असलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या नाशिक येथील वास्तव्याची व्यवस्था स्वखर्चाने करावी लागेल. प्रशिक्षणार्थीना ३१ जानेवारी १९८९ रोजीच्या शासन निर्णयानुसार प्रवास भत्ता अनुज्ञेय आहे. तसेच ज्या प्रशिक्षणार्थीचे मुख्यालय नाशिक महानगरपालिकेच्या हद्दीत आहे त्यांना हातखर्ची भत्ता अनुज्ञेय असेल,असेही सहाय्यक संचालक थैल यांनी कळविले आहे.
