नाशिक दिनकर गायकवाड रेन हार्वेस्टींग अनिवार्य केले असतानाही अनेक सरकारी कार्यालयांकडून या नियमाकडे दुर्लक्ष न होत असल्याचे समोर आले आहे. याबाबत नाशिक महापालिका ५ प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. अशा सर्व शासकीय विभागांना १५ दिवसांत तात्काळ नोटिसा पाठविण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त करिष्मा नायर यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.
मोठ्या सोसायट्या, टाऊनशिप या ठिकाणीही पथके पाठवून रेन हार्वेस्टिंग होते की नाही याची माहिती न घेण्याच्या सुचना देण्यात आल्या. याबाबत स्थायी समितीच्या सभागृहात नायर यांच्या
अध्यक्षतेखाली गोदावरी संवर्धन उपसमितीची नुकतीच बैठक पार पडली. यावेळी त्या बोलत होत्या. राज्य शासनाच्या निर्देशांनुसार १० हजार चौरस फूटांपेक्षा मोठ्या इमारतींना आणि सर्व सार्वजनिक इमारतींना रेन हार्वेस्टींग करणे बंधनकारक आहे. मात्र मनपाच्या सर्वेक्षणात अनेक सरकारी कार्यालयांनी अद्यापही रेन हार्वेस्टींगची अंमलबजावणी न केल्याचे आढळून आले. त्यात नाशिक महानगरपालिकेच्या आस्थापनांचाही समावेश आहे. या पार्श्वभूमीवर नायर यांनी बांधकाम व मालमत्ता विभागांना निर्देश देत संबंधित कार्यालयांना नोटिसा पाठविण्याची प्रक्रिया तात्काळ सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.
नोटिसामध्ये रेन हार्वेस्टींग व्यवस्था त्वरित उभारावी, नसल्यास कारवाईला सामोरे जावे लागेल, असे स्पष्ट करण्यात येणार आहे. मनपा प्रशासनाने मागील काही वर्षांत शासकीय इमारतींमध्ये रेन हार्वेस्टींगची अंमलबजावणी वाढविण्यासाठी अनेकदा सूचना केल्या होत्या. मात्र प्रत्यक्षात अनेक विभागांकडून केवळ कागदोपत्री माहिती सादर केली जात असून कामाचा वेग अत्यंत मंद असल्याचे प्रशासनाच्या तपासणीत दिसून आले. यामुळे आता कठोर भूमिका घेत वास्तविक अंमलबजावणी करण्यावर जोर देण्यात आला आहे. दरम्यान, नंदिनी नदीला १२ नैसर्गिक
ओढे मिळतात. त्या ओढ्यांवर नैसर्गिक पद्धतीने ट्रीटमेंट झाली पाहिजे. यासाठी गोवर्धन येथे गोदावरी समिती पुढील आठवड्यात भेट देणार आहे. तसेच शहरातील स्वच्छतेसाठी दर शुक्रवारी घनकचरा विभागाची बैठक घेण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला. याशिवाय बैठकीत 'चला जाणूया नदीला' बाबत चर्चा झाली असून नद्यांची भूजल पातळी वाढविण्याची गरज व्यक्त करण्यात आली. या बैठकीस उपायुक्त अजित निकत, शिक्षणाधिकारी डॉ. मीता चौधरी, पर्यावरणप्रेमी राजेश पंडित, सुनील पेंढेकर, चंद्रकांत पाटील, मनोज साठे, रोशन केदार,अपर्णा कोठावळे,नीलेश झंवर आदी उपस्थित होते.
