अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नाराधमास फाशी द्या;मनमाडला मुक मोर्चा

Cityline Media
0
नाशिक दिनकर गायकवाड मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील तीन वर्षीय अल्पवयीन चिमुरडीवर झालेल्या अमानुष अत्याचार व हत्येप्रकरणी आरोपीला कठोरात कठोर शिक्षा मिळावी, तसेच प्रकरणाची फास्ट ट्रॅक कोर्टात सुनावणी व्हावी, या मागणीसाठी मनमाड सराफ सुवर्णकार असोसिएशनतर्फे मूक मोर्चा काढण्यात आला.काळ्या फिती लावून निदर्शने करत या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला.
मनमाड शहरातील मुख्य मार्गावरून निघालेल्या या मूक मोर्चाला सर्वपक्षीयांनी पाठिंबा दिला. मोर्चेकऱ्यांनी अत्याचार करणाऱ्याला

फाशी झालीच पाहिजे, फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवा अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. नेत्यांनी पोलीस निरीक्षक विजय करे यांना निवेदन देत कठोर कारवाईची मागणी केली. डोंगराळे गावात तीन वर्षीय निरपराध बालिकेवर

अत्याचार करून निघृण हत्या केल्याची संतापजनक घटना समोर आल्यानंतर समाजात असंतोष निर्माण झाली आहे. मानवतेला काळिमा फासणारी ही घटना असून आरोपींना कठोरात कठोर शिक्षा मिळणे अत्यावश्यक असल्याची भावना समाजातून व्यक्त होत आहे.

सराफ सुवर्णकार असोसिएशनने निवेदनात प्रकरणाची जलद, निष्पक्ष आणि काटेकोर चौकशी करून आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी. कठोर कलमांखाली गुन्हा नोंदवून फास्ट ट्रॅक कोर्टात सुनावणी व्हावी. पीडित बालिकेच्या कुटुंबीयांना तातडीची आर्थिक मदत व सुरक्षा उपलब्ध करून द्यावी.या अमानुष कृत्याचा निषेध करत समाजात तीव्र संता संतापाची लाट उसळली असून अशा घटनांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने तातडीने निर्णयात्मक पावले उचलावीत,अशी मागणी करण्यात आली.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!