जो पक्ष बौद्ध समाजाच्या मागण्या पूर्ण त्यांनाच पाठिंबा
संगमनेर प्नतिनिधी शहरातील बौद्ध समाज सर्वच पक्षांबरोबर आत्तापर्यंत अनेक वर्षापासून कार्यरत आहे.तमाम बौद्ध समाज प्रामाणिक असून छत्रपती शिवाजी महाराज,महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा घेवून चालत आला आहे.बौद्ध समाज आजपर्यंत त्यांच्या अस्मिता, न्याय, हक्कासाठी लढत आला आहे. पण यापुढे जो पक्ष बौद्ध समाजाच्या खालील मागण्यांची पुर्तता करेल त्यांच्या बरोबर पुढील काळातही पाठीमागे राहील.असे प्रसिद्ध पत्रकान्वये बुदिस्ट युथ फेडरेशन नुकतेच प्रकाशित केले आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की आम्ही बौद्ध समाजाच्या एकत्रितपणे मागण्या ठरविल्या आहे त्या पुढीलप्रमाणे
१) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुर्णाकृती पुतळा निर्माण करणे.
२) बौद्ध समाजासाठी बहुउद्देशीय सभागृह / सांस्कृतिक भवन उभारणे.
३) शहराच्या मध्यवर्ती भागात बौद्धविहार व विपश्यना केंद्र निर्माण करणे.
४) संगमनेर शहर व तालुक्यातील ज्या ठिकाणांना भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ठिकाणंना विशेष दर्जा देवून स्मारक विकसित करणे. ,अ) पानोडी (थोरात वाडा),
ब) पिंपरणे (रोहम वस्ती), क) बौद्ध वस्ती (पुणे नाका, संगमनेर)
५) संगमनेर शहर व तालुक्यात बौद्धांची संख्या निर्णायक असल्याने त्याप्रमाणात योग्य व बौद्ध समाजात कार्यरत असलेल्यांना व बौद्ध समाज सुचवेल त्याप्रमाणे प्रतिनिधीत्व देणे.
६) बौद्ध समाजातील सुशिक्षीत बेरोजगार युवकांसाठी उद्योजकता विकास ट्रेनिंग सेंटर निर्माण करणे.
प्रसिद्ध पत्रकावर सचिन साळवे,अमोल कदम सचिन गायकवाड,बाबासाहेब मोकळ रवी भालेराव
सुरेश बागुल गौरव यादव,निलेश कुसरे आदींच्या सह्या आहेत
