वृक्षारोपणाने दशक्रिया विधी,सामाजिकता जपत लोखंडे परिवाराने दिला पर्यावरण जनजागृतीचा अनोखा संदेश
झरेकाठी सोमनाथ डोळे दिवंगत श्रीमती चंद्रभागाबाई यशवंत लोखंडे यांच्या स्मृती प्रित्यर्थ त्यांच्या दशक्रिया विधी निमित्त रामपूर येथील स्मशानभूमी परीसरात नागरिकांना विविध विधी करताना जमलेल्या समुदायला उन्हात बसावे लागते त्याकरिता सावलीची असणारी गैरसोय दूर करण्यासाठी काही वडाच्या झाडांचे रोपण करून त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी चिरंजीव कोल्हार खुर्दचे मा.उपसपंच बाळासाहेब लोखंडे निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवरण मंडळाचे राज्य सचिव- प्रा.डॉ.अनिल लोखंडे, दत्तात्रय सरोदे,सुदाम लोखंडे, बापूराव लोखंडे, रायभान पठारे , संत सावता महाराज पायी दिंडी सोहळ्याचे व्यवस्थापक - ह भ प शंकर महाराज लोखंडे, ह भ प राम महाराज ढाकणे, विलास खळदकर,सोमनाथ डोळे,बाबा नालकर आदी ग्रामस्थ व पाहुणे उपस्थित होते.
वृक्षारोपण करून लोखंडे परिवाराने सामाजिकता जपत आगळावेगळा पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.याबद्दल रामपूर येथील ग्रामस्थांनी या परिवारास धन्यवाद दिले. हा परिसर निश्चितच येणाऱ्या काळात हिरवाईने नटलेला दिसेल आणि सध्या दशक्रिया विधीसाठी काक स्पर्श होत नाही.
त्यामुळे आर्थिक परिस्थिती अभावी पुणतांबा किंवा इतर धार्मिक स्थळी जाऊन हा धार्मिक विधी करणे होत नाही त्यामुळे सर्वांची कुचंबणा होते ,ती टाळणे अशा कृतीने पुढील काळात शक्य होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
