नाशिक दिनकर गायकवाड घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा व कुलूप कशाच्या तरी सहाय्याने तोडून घरात प्रवेश करून सुमारे सव्वा लाख रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना शिवाजी चौक येथे घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, की फिर्यादी कविता चिंधा सोनवणे (रा. गीताई अपार्टमेंट, पांगरे मळा, शिवाजी चौक, सिडको) यांच्या राहत्या घराच्या लाकडी दरवाजाचा कडीकोयंडा व कुलूप अज्ञात चोरट्याने कशाच्या तरी
सहाय्याने तोडून घरात प्रवेश केला. घरातील कपाटात असलेले ४२ हजार रुपये किमतीचे सहा ग्रॅम वजनाचे सोन्याचे ब्रेसलेट, ५६ हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या दोन अंगठ्या, सात हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र व २० हजार रुपये रोख असा एकूण १ लाख २५ हजार रुपये किमतीचा ऐवज घरफोडी करून चोरून नेला.या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून,पुढील तपास पोलीस हवालदार देसले करीत आहेत.
