नाशिक दिनकर गायकवाड भाजीपाला घेणाऱ्या महिलेच्या पाठीमागून मोटारसायकलीवरून आलेल्या अनोळखी इसमाने दीड तोळ्याची सोन्याची पोत बळजबरीने चोरून नेल्याची घटना अमृतधाम येथे घडली.
फिर्यादी सुनीता अजय कपिले (रा. दुर्गानगर,अमृतधाम) या दि.६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी घराजवळ भाजीपाला घेत होत्या. त्यावेळी त्यांच्याजवळ भाजीपाला घेण्याच्या उद्देशाने दुचाकीवरून आलेल्या अज्ञात इसमाने कपिले यांच्या गळ्यातील १४ ग्रॅम वजनाची ४५ हजार रुपये किमतीची सोन्याची पोत बळजबरीने खेचून घेतली व तो मोटारसायकलीवरून पळून गेला. या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून,पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पंचमुखे करीत आहेत.
