झरेकाठी सोमनाथ डोळे संगमनेर तालुक्यातील झरेकाठी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा वर्धापन दिन तसेच माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात पार पडला मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी बाळासाहेब वाकचौरे हे होते.प्रसंगी माजी विद्यार्थ्यांचे स्वागत फटाक्यांची आतषबाजी करून करण्यात आले.यावेळी संपूर्ण शाळा फुलांनी व फुग्यांची सजावट करण्यात आली होती.
यावेळी माजी विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.विद्यार्थ्यांनी आपले शालेय जीवनातील अनुभव विद्यार्थ्यांसमोर कथन करून आपल्या शालेय जीवनातील अविस्मरणीय अनुभवांना उजाळा दिला.यावेळी या शाळेचे आमच्यावर थोर उपकार आहेत त्यामुळेच आम्ही आमच्या जीवनातील अतिउच्च अशी शिखरे पार करू शकलो असेही विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणात सांगितले.
शाळेला भविष्यात लागेल ती मदत करण्याचे आश्वासन विद्यार्थ्यांनी दिले.यावेळी सरपंच अशोक वाणी.ॲड. पोपट वाणी. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संभाजी व्यवहारे. उपाध्यक्ष गोरक्ष निवृत्ती वाणी,सेवा निवृत्त शिक्षक रामचंद्र सखाहरी डोळे भाजपा बुथ प्रमुख सोमनाथ डोळे,
शाळेचे मुख्याध्यापक विनोद उकिर्डे,बाळकृष्ण भालेराव, श्रीमती प्रीती खालकर, श्रीमती कल्याणी साठे, श्रीमती सुनिता आहोळ ,सागर म्हंकाळे,.श्रीकांत दाभाडे,उत्तम वाणी,श्रीरंग बर्डे, रमेश डोळे, मंगेश व्यवहारे, मदन म्हंकाळे,समीर तांबोळी, डॉ.नवनाथ वाणी शिवाजी वाणी, नारायण व्यवहारे,सेवा सोसायटीचे अध्यक्ष जिजाबापु वाणी,आदिनाथ वाणी,जालिंदर वाणी, राहुल वाणी,तुषार वाणी, बाळासाहेब वाकचौरे,रखमा निकम,जॉन म्हंकाळे,आदींसह माजी विद्यार्थी हजर होते
