बिबट्याच्या हल्ल्यात जखमी महिलेस कुटे हॉस्पिटल येथे खासदार वाकचौरे यांची भेट

Cityline Media
0
संगमनेर नितीनचंद्र भालेराव तालुक्यातील हिवरगाव पावसा येथील टेमगिरे वस्तीवरील अर्चना संदीप टेमगिरे या महिलेवर बिबट्याने हल्ला केला होता.बिबट्याच्या हल्ल्यामध्ये सदर महिला गंभीर जखमी झाल्यामुळे कुटे हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू आहेत.सदर घटनेची माहिती मिळताच शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी कुटे हॉस्पिटल येथे भेट दिली.
जखमी अर्चना टेमगिरे यांच्या तब्येतीची चौकशी करत औषध उपचाराबाबत आवश्यक त्या उपाययोजना करण्याबाबत हॉस्पिटल प्रशासनास सूचना केल्या.त्याप्रसंगी शिवसेना तालुका प्रमुख अमर कतारी,माजी जिल्हा परिषद सदस्य अशोक सातपुते,उप तालुका प्रमुख भीमाशंकर पावसे,डॉ.कुटे,वृक्षमित्र गणपत पावसे,संदीप टेंमगिरे,संपत पावसे यांच्यासह शिवसेना (उबाठा) संगमनेर तालुक्यातील कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते. 

यावेळी खासदार भाऊसाहेब वाकचौरे म्हणाले की हिवरगाव पावसा परिसरात बिबट्याच्या हल्ल्यामध्ये आतापर्यंत चार जणांचा बळी गेलेला आहे.तसेच अनेक नागरिकांवर हल्ले झालेले आहेत.वाढते बिबट्याचे हल्ले चिंताजनक आहे हिवरगाव पावसा पंचक्रोशीत बिबट्याची शोध मोहीम हाती घेऊन येथील परिसर बिबट्याच्या दहशतीतून मुक्त करण्यासाठी वन विभागाने तात्काळ कठोर उपाययोजना कराव्यात अशी मागणी भाऊसाहेब वाकचौरे यांनी वन विभागाकडे  केले आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!