बिबट्या प्रणव क्षेत्रात दिवसा विज देण्याच्या धोरणाचे शेतकऱ्यांमध्ये समाधान
संगमनेर प्रतिनिधी नितीनचंद्र भालेराव महावितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकारी यांच्या आदेशानुसार बुधवार दिनांक-१२ नोव्हेंबर पासून थ्री फेज कृषी पंपाच्या फिडर वेळापत्रक मध्ये बदलण्यात करण्यात आले आहेत.
त्याप्रमाणे ११.व्ही. ३ फेज फिडर हिवरगाव पावसा सबस्टेशन अंतर्गत झोळे (खांडगाव) एजी,
उंबरवाडी व सावरगाव तळ एजी तसेच हिवरगाव पावसा एजी, शिरापूर व चंदनापुरी एजी या गावामध्ये थ्री फेज विजेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.
आज बुधवारपासून पुढील प्रमाणे थ्री फेज वेळापत्रक राहील.
११ केव्ही शिरापूर व चंदनापुरी एजी ९:०० ते १७:००
११ केव्ही हिवरगाव पावसा एजी ८:०० ते १६:००
११ केव्ही झोळे व खांडगाव एजी १०:०० ते १८:००
तसेच रात्री ११ केव्ही उंबरवाडी व सावरगाव तळ एजी २२:०० ते ०६ राहील.
महावितरणच्या दिवसा कृषी पंपाची विज देण्याच्या धोरणाचे हिवरगाव पावसा पंचक्रोशीतील शेतकरी वर्गातून स्वागत होत आहे. हिवरगाव पावसा व परिसर बिबट्या प्रणवक्षेत्र बनला आहे. या परिसरात गेल्या वर्षभरात चार व्यक्तींचा बळी बिबट्याच्या हल्ल्यात गेला आहे.
त्यामुळे रात्रीचे शेताला पाणी भरण्यासाठी शेतकरी वर्गामध्ये भीती निर्माण झाली आहे.रात्री अपरात्री घराबाहेर पडणे धोक्याचे बनले आहे अशा परिस्थितीत महावितरणने कृषी पंपाची विज दिवसा उपलब्ध करून दिल्यामुळे हिवरगाव पावसा शेतकरी व ग्रामस्थांनी हिवरगाव पावसा सबस्टेशनचे सहाय्यक अभियंता श्री.शेख यांच्यासह महावितरण कंपनीचे वरिष्ठ अधिकारी यांचे आभार व्यक्त केले आहे.
