झरेकाठी सोमनाथ डोळे संगमनेर खुर्दपासून सुरू झालेला रस्ता नियमित रहदारीने अहिल्यानगर शहरापर्यंत जातो मात्र हाच तालुक्यातील शिबलापुर ते गुहा फाटा रस्त्याची दुरवस्था झाली असून दळणवळणाच्या अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत या रस्त्यावरील सर्व गावांची वाहतूक ठप्प झाली असून रस्ता दुरुस्ती पाहणी करण्याच्या सूचना अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री,तथा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पा.यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आणि रस्ता दुरुस्तीसाठी आलेल्या शिष्टमंडळाला आश्वाशित केल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
शिबलापुर ते गुहा फाटा,या रस्त्यावर सातत्याने अपघात होत आहेत.ह्या रस्ताची अवस्था चिंताजनक झाली असून तो दुरुस्त करण्याकरिता तातडीने निधी उपलब्ध करून देऊन रस्ता दुरुस्त करण्यासाठी भाजपा बूथ प्रमुख तसेच जनसेवा युवा मंच सदस्य सोमनाथ डोळे यांनी एक शिष्टमंडळ भेटीसाठी नेले होते.
या शिष्टमंडळात आश्वी येथील मा.उपसरपंच,संजय गायकवाड,निभेंरे तंटामुक्ती अध्यक्ष विष्णू सिनारे,अमोल हारदे, शिवाजी हारदे,मनोज हारदे, जिजाबापू सिनारे,पाराजी धनवट,ज्ञानदेव साबळे,नारायण धनवट,बलराज पाटील, साहेबराव अनाप,
मच्छिंद्र अंत्रे पोपट आनंद वाणी, स्वप्निल वाणी,अभिनव वाणी,राहुल वाणी, रमेश डोळे,अशोक अंत्रे, सुभाष शिंदे,सरपंच.शांताराम सिनारे,सोनगाव सरपंच सौ.अलका शिंदे,राहुरी पंचायत समितीचे मा. सभापती भीमराज हरदे,बाळकृष्ण हारदे,दाढ खुर्द सरपंच सतीश जोशी,मा.सरपंच अशोक जोशी,ॲड.अनिल भोसले, सुरेश नागरे, पद्मश्री विखे कारखान्याचे संचालक विजय म्हसे,या शिष्टमंडळाने हा रस्ता दुरुस्त होण्याबाबत अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री यांना निवेदन देण्यात आले होते त्या निवेदनाची तात्काळ दखल घेऊन नामदार राधाकृष्ण विखे पा. यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या की ह्या रस्त्याची पाहणी करून रस्ता काम त्वरीत सुरु करण्यात यावे
हा रस्ता दोन तालुक्यातील गावांचा असून चाळीस गावांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे,नगर-मनमाड राज्य महामार्ग रस्ता कोल्हार येथे जर वाहतूक जाम झाली तर प्रवासी गुहा फाटा ते शिबलापूर या रस्त्याने पर्याय मार्ग म्हणून लोणी व संगमनेरकडे,प्रवाशांना प्रवास करण्यासाठी सोयीचा मार्ग आहे, तसेच संगमनेर तालुक्यातील,व राहुरी तालुक्यातील देवगाव,जाखुरी, पिंपरणे, कनोली,ओझर, शेडगाव, हंगेवाडी, मालुंजे, पानोडी, आश्वी, दाढ खुर्द,,खळी, झरेकाठी,चनेगाव, निंभोरे, तांभेरे, सोनगाव,अनापवाडी, असा तब्बल चाळीस गावांचा मुख्य शिव रस्ता आहे,चाकरमाने आणि व्यवसायिक यांना दररोज या मार्गावरून प्रवास करत दळणवळण करावे, लागते मात्र रस्त्याच्या दयनीय अवस्थेमुळे मुलांच्या शिक्षणावर शेतकऱ्यांचे उत्पन्नावर विक्रीवर आणि सामान्य जनतेच्या रोजच्या जगण्यावर घाला बसला आहे.
या शिष्टमंडळाला केलेल्या मागणीची पालकमंत्री राधाकृष्ण विखे पा.यांनी दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना रस्ता दुरुस्त करण्यासाठी व पाहणी करण्यासाठी सूचना केल्यामुळे या परिसरातील नागरिकांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पा.यांचे आभार व्यक्त केले आहे
