नाशिक दिनकर गायकवाड कळवण तालुक्यातील कनाशी गावात धार्मिक स्थळांच्या शेजारीच अवैध देशी दारू व डुकराचे मांस चिक्री सुरू असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.या अवैध व्यवसायामुळे गावातील सामाजिक,धार्मिक आणि नैतिक बातावरण पूर्णतःदूषित झाले असून नागरिकांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
कनाशी गावातील देवी मंदिर,बौद्ध विहार तसेब मुलांच्या वसतिगृहाशेजारीच काही व्यक्तींनी खुलेआम देशी दारू व डुक्कर मांस विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे. या ठिकाणी सकाळपासून रात्री उशिरापर्यंत दारू खरेदीसाठी येणा-यांची गर्दी असते, त्यामुळे परिसरात सतत गैरप्रकार, शिवीगाळ, भांडणे आणि गोंधळ सुरू असतो, स्थानिक नागरिकांच्या सांगण्यानुसार,दररोज दारूच्या नशेत काही लोक गावात गोंधळ घालतात. महिलांशी व वृद्धांशी गैरवर्तन करतात. धार्मिक स्थळाजवळ असा प्रकार सुरू असल्याने गावातील महिला, विद्यार्थी व भाविक भयभीत झाले आहेत. गावकऱ्यांनी या प्रकाराविरुद्ध अभोणा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असूनसुद्धा अभोणा पोलिसांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष असल्याचा आरोप नागरिकांकडून
होत आहे. पोलीस प्रशासनाने आतापर्यंत कोणतीही ठोस कारवाई केली नसल्याने नागरिकांचा संयम सुटू लागला आहे. याच पार्श्वभूमीवर कनाशी ग्रामपंचायत आणि उपविभागीय पोलीस अधीक्षक कार्यालयातही नागरिकांनी लेखी तक्रार दाखल केली आहे.
तक्रार दाखल करून बरेच दिवस उलटून गेले तरीही संबंधित अवैध देशी दारू विक्रेत्यांवर कोणतीही कारवाई झाली नसल्यामुळे गावकऱ्यांचा संताप शिगेला पोहोचला आहे. गावातील पवित्र मंदिर, बौद्ध बिहार व मुलांच्या वसतिगृहाजवळ असा गलिच्छ व्यवसाय सुरू ठेवणे हे आमच्यासाठी अत्यंत अपमानाप्यद आहे.
पोलिसांनी आणि प्रशासनाने तत्व्ाळ हस्तक्षेप करावा, अन्यथा आम्ही आंदोलन करण्यास भाग पडू, असा इशारा स्थानिक नागरिकांनी निवेदनाद्वारे केला आहे. दरम्यान, स्थानिक नागरिकांनी प्रशासनाला तातडीने कारवाईची मागणी करताना स्पष्ट इशारा दिला आहे की, जर अवैध देशी दारू व डुक्कर मांस विक्री थांबवली नाही, तर ते उच्चस्तरीय चौकशीची मागणी करून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शन करणार असल्याचे यावेळी सांगितले आहे. कनाशी गावातील या प्रकारामुळे संपूर्ण कळवण तालुक्यात चर्चा रंगली असून नागरिक आता पोलीस प्रशासन संबंधितांवर काय कारवाई करणार याकडे लक्ष ठेवून आहेत.
