आमदार प्रा.देवयानी फरांदे यांची मागणी
नाशिक दिनकर गायकवाड नाशिक महानगर पालिकेमध्ये विविध पदांसाठी सुरू असलेल्या नोकरभरती प्रक्रियेत स्थानिक पात्र आणि सुशिक्षित तरुणांना प्राधान्य द्यावे, अशी मागणी आ.प्रा.देवयानी सुहास फरांदे यांनी केली आहे.
नाशिक महानगरपालिकेत दीर्घकाळ भरती न झाल्याने नाशिक शहर आणि जिल्ह्यातील अनेक शिक्षित तरुण बेरोजगार आहेत.अशावेळी सुरू झालेल्या या भरती प्रक्रियेत स्थानिक तरुणांना न्याय मिळावा, हीच माझी भूमिका असल्याचे आमदार फरांदे यांनी स्पष्ट केले आहे. नाशिक महानगरपालिकेच्या उत्पन्नाचे स्त्रोत हे स्थानिक नागरिकांच्या करातूनच येते. त्यामुळे नोकरभरतीत स्थानिकांना प्राधान्य देणे हे न्याय्य आणि आवश्यक आहे. स्थानिक तरुणांना संधी दिल्यास ते शहराच्या विकासात निष्ठेने व जबाबदारीने योगदान देतील,असे त्यांनी नमूद केले.
