नाशिक दिनकर गायकवाड अखिल भारतीय कलावंत न्याय हक्क समितीतर्फे आयोजित राज्यव्यापी कलावंतांच्या महाक्रांती मेळाव्यात कलावंतांची वज्रमूठ बांधण्यात आली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते संगीत कलारत्न पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
महाकवी कालिदास कलामंदिरात नुकतेच मा.मंत्री बबन घोलप यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या मेळाव्यात विविध प्रकारच्या लोककलावंतांसह इतर कलाकारांनी सादरीकरण केले. यावेळी व्यासपीठावर माजी आमदार बाळासाहेब सानप, छावा क्रांतिवीर सेनेचे करण गायकर, मेळाव्याचे स्वागताध्यक्ष सोमनाथ गायकवाड, खंडूराज गायकवाड, समाधान देवरे, अनिता जगताप, रंजना देसले आदी मान्यवर उपस्थित होते.
शाहिरी जलसा, भारुड, भजन, जागरण गोंधळ, कीर्तन, बहुरूपी, वासुदेव, पिंगळा, आराधी, ऑर्केस्ट्रा, कराओके, मिमिक्री, सनई-संबळ वादन, कव्वाली, शिवकालीन कसरती, शास्त्रीय गायन आदी कला प्रकारांचे या मेळाव्यात सादरीकरण करण्यात आले.
संगीतकार सुधीर सराफ, गायक नंदकुमार देशपांडे, संजय किलेदार, उमेश गायकवाड, रज्जाक शेख, प्रकाश योजनाकार विनोद राठोड, रवी बराथे, अपर्णा देशपांडे, मीना निकम व शाम लोंढे यांना मान्यवरांच्या हस्ते संगीतकला रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
भायात्रेनंतर 'संगीत कलारत्न' पुरस्कार वितरण करण्यात आले. कलावंत, साहित्यिक, भजनी मंडळ व वारकरी असे सर्वच यात सहभागी झाले होते. कलावंत आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे, यासह विविध ठराव करण्यात आले. तसेच स्पंदन काव्य संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. गोल्फ क्लब मैदान येथून कलावंतांची शोभायात्रा काढण्यात आली.
गुलाब सय्यद, प्रतिभा जगताप, ॲड.अनिल जगताप, माजी महापौर नयना घोलप,अनिता रणशेवरे, नानासाहेब सोनकांबळे, सदाशिव भुजंगे,दत्तात्रय तांबे,रफिक सय्यद, बापू सपकाळे,शाम वैष्णव,कर्तारसिंग ठाकूर आदींनी हा मेळावा यशस्वितेसाठी प्रयत्न केले.
