अहिल्यानगर प्रतिनिधी “शब्दगंध साहित्यिक परिषद,महाराष्ट्र राज्याच्या वतीने राज्यस्तरीय वाड:मय स्पर्धा आयोजित करण्यात आली असून ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत साहित्यिकांनी आपल्या साहित्यकृती पाठवाव्यात,उत्कृष्ट साहित्यकृतीना शब्दगंध साहित्य पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे ” अशी माहिती शब्दगंध चे संस्थापक,सचिव सुनील गोसावी व अध्यक्ष राजेंद्र उदागे यांनी दिली.
गेल्या वीस वर्षापासून शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने राज्यस्तरीय वाड:मय स्पर्धा घेण्यात येतात.यावर्षी एक जानेवारी २०२५ ते ३१ डिसेंबर २०२५ दरम्यान प्रकाशित झालेले कथासंग्रह, काव्यसंग्रह, लेखसंग्रह, कादंबरी, आत्मचरित्र, संशोधन ग्रंथ ,ललितसंग्रह,
बालवाड:मय इ प्रकारातील पुस्तकांच्या तीन प्रती,परिचय,५ रु पोस्टाची ५ तिकिटे यासह शब्दगंध साहित्यिक परिषद, फुलोरा,लक्ष्मी कॉलनी,भिस्तबाग महालाजवळ,तपोवन रोड, सावेडी अहिल्यानगर – ४१४००३ मो.क्र.९९२१००९७५० येथेपाठवाव्यात,
परिक्षण झाल्या नंतर सतराव्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनात लेखक,कवींना शब्दगंध साहित्य पुरस्कार देऊन मान्यवरांचे हस्ते गौरविण्यात येणार आहे.सन्मानपत्र. सन्मान चिन्ह,शाल असे पुरस्काराचे स्वरूप राहणार आहे.
तरी जास्तीत जास्त नवोदितांनी शब्दगंध साहित्य पुरस्कारासाठी आपली पुस्तके पाठवावेत,असे आवाहन कार्याध्यक्ष ज्ञानदेव पांडूळे,उपाध्यक्ष मा.प्राचार्य डॉ.जी.पी.ढाकणे,कार्यवाह भारत गाडेकर,खजिनदार भगवान राऊत, राज्य संघटक प्रा.डॉ.अशोक कानडे यांनी केले आहे.
