नाशिक दिनकर गायकवाड राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या पेठ तालुकाध्यक्षपदी रामदास गवळी यांची निवड करण्यात आली आहे. त्यांना नियुक्ती पत्र जिल्हाध्यक्ष ॲड रवींद्र पगार, युवा नेते गोकुळ झिरवाळ यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले आहे.
यावेळी रामदास गवळी यांनी सांगितले की, पक्ष वाढीसाठी पुढील काळात चांगले काम केले जातील.
राजकारण न करता सामाजिक कामांना प्राधान्य देऊन जनसामन्याचे प्रश्न सोडविण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले. त्यांच्या निवडीचे मंत्री ना. नरहरी झिरवाळ, नामदेव हलकंदर, पुंडलिक सहारे, पुंडलिक सातपुते,सोमनाथ जाधव, मोहन गावंड सुरेश जाधव, हनुमंत गवळी, पूनम गवळी, हिरामण पवार, पुंडलिक सातपुते,बाळू गवळी, हेमराज गबळी, दुर्गादास गवळी, गणेश गवळी आदींनी अभिनंदन केले आहे.
