नाशिक दिनकर गायकवाड कसमादे परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे उन्हाळी कांदा उत्पादक शेतकऱ्यांची पुन्हा एकदा घांदल उडाली आहे. नुकतीच लागवड केलेली दहा ते वीस स दिवसांची कांदा रोपे सततच्या पावसाने पूर्णतः खराब झाली आहेत. परिणामी शेतकऱ्यांना पुन्हा मिळेल ते बीज घेऊन नव्याने कांदा लागवड करण्याची वेळ आली आहे.
गेल्या तीन दशकांत पहिल्यांदाच शेतकऱ्यांच्या घरगुती कांदा बीजाचा साठा संपला आणि बाजारात नामांकित कंपन्यांच्या बियाण्यांना सोन्याचा भाव मिळू लागला. बाजारातील बीज सफेल या धास्तीने शेतकऱ्यांनी कृषी सेवा केंद्रापासून एजंटांच्या दुकानांपर्यंत, सर्वत्र बीज मिळविण्यासाठी गर्दी केली असल्याचे दिसते.
कृषी विभागाने कांदा बियाणे उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी शांताराम जाधव,भाऊसाहेब जाधव, मधुकर जाधव,केवळ बाघ, दादाजी जाधव,रामदास आहेर, हंसराज वाघ, दत्तू बाघ, संदेश जाधव,किरण जाधव, किशोर जाधव,विकास मोरे, उत्तम मोरे आदींनी केली आहे.
