नाशिक दिनकर गायकवाड निफाड तालुक्यातील ओझर येथील बहुप्रतीक्षेत ओझर नगरपरिषदेच्या पहिल्याच निवडणुकीत महायुती मधील घटकपक्ष असलेले भाजप, राष्ट्रवादी अजित पवार गट, शिंदे गट व ठाकरे शिवसेना अशी चौरंगी लढत होण्याचे जवळपास निश्चित झाले आहे.
फॉर्म भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत नगरसेवक पदासाठी २०६ तर नगराध्यक्षपदासाठी १८ अर्ज आले होते. छाननी मध्ये नगरसेवक पदासाठी ३२ अर्ज बाद झाले आहेत. नगराध्यक्षपदासाठी दोन अर्ज बाद
झाल्याने १६ उमेदवार नगराध्यक्षपदाच्या रेस मध्ये आहेत. आता किती उमेदवार माघार घेणार यावरच ओझर नगरपरिषदेची होणारी पहिलीच निवडणूक रंगतदार होणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. पहिल्याच निवडणुकीत कांटे की टक्कर होणार असे संकेत मिळत असून आगामी निवडणुकीसाठी १३ प्रभागांसाठी २७ उमेदवार रिंगणात आहे.यंदा ओझर निवडणुकीमध्ये महिलाराजच असेल असे दिसत आहे.आता अर्ज माघारीनंतरच खरे चित्र स्पष्ट होईल,अशी शक्यता आहे. त्याकडेच आता सर्व उमेदवारांचे लक्ष लागून आहे.
