नाशिक दिनकर गायकवाड वकिलाच्या बंगल्यातून चंदनाचे झाड अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना इंदिरानगर परिसरात घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी,की फिर्यादी ॲड.कांतीलाल मोतीलाल तातेड (वय ७३) हे जीवनस्वप्न को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी, बंगला नंबर ५, इंदिरानगर येथे राहतात. दि. १७नोव्हेंबर रोजी रात्री ३ वाजेच्या
सुमारास तातेड यांच्या बंगल्याच्या मागील बाजूस असलेल्या पाण्याच्या टाकीजवळ सुमारे २५ फुटांचे चंदनाचे झाडस आहे. हे झाड अज्ञात चोरट्याने कशाच्या तरी सहाय्याने कापून चोरून नेले..
या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून,याबाबत पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक साळी करीत आहेत.
