नाशिक दिनकर गायकवाड चिंचखेड येथे तुलसी विवाह सोहळा हजारो बन्हाडी मंडळींच्या साक्षीने आणि पुरोहितांच्या मंगलाष्टकांनी मोठ्या उत्साहात झाला.
सकाळी मांडव डहाळे आणि सायंकाळी हळदीचा आणि दिवट्यांचा कार्यक्रम झाला.चिंचखेड येथील तुलसी विवाह सोहळा नाशिक जिल्ह्यात प्रसिद्ध आहे.दरवर्षी या तुलसी विवाह सोहळ्याला जिल्हाभरातून लोक उपस्थिती लावतात. परंतु यावर्षी अतिवृष्टीमुळे शेतक-यांचे अतोनात नुकसान झाल्याने चिंचखेड ग्रामस्थांनी एकत्र येत यावर्षीचा तुलसी विवाह सोहळा साधा आणि गावापुरताच करण्याचा निर्णय घेतला. पुरोहितांच्या उपस्थितीत मंगलाष्टकात हा विवाह सोहळा चिंचखेडकरांच्या प्रचंड उपस्थितीत उत्साहात झाला.
यावेळी महाप्रसादाचेदेखील आयोजन करण्यात आले होते. विवाह साथा असला तरी चिंचखेडकरांची उपस्थिती लक्षणीय होती. पुढील वर्षी निसर्गाने साथ दिली तर दरवर्षीप्रमाणेच तुलसी विवाह मोठ्या जोमात साजरा करू, असा निर्धार यावेळी चिंचखेडकरांनी व्यक्त केला.या विवाह सोहळ्यासाठी चिंचखेड परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.
