शोषित वंचित दुर्लक्षित घटकांना शिक्षणासाठी मुख्य प्रवाहात आणणाऱ्या बी.डी.भालेकर शाळेच्या जागी विश्रामगृह नको

Cityline Media
0
विश्रामगृहला विरोध करणाऱ्या  खासदार राजाभाऊ वाजे यांची मागणी

नाशिक दिनकर गायकवाड नाशिक महानगरपालिकेने शहरातील बी. डी. भालेकर शाळेची इमारत पाडून त्या ठिकाणी विश्रामगृह उभारण्याचा केलेला प्रस्ताव तीव्र वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या निर्णयाला नाशिकचे खा.राजाभाऊ वाजे यांनी विरोध दर्शवून मनपाला हा निर्णय तातडीने मागे घेण्याची मागणी केली आहे.
खासदार वाजे यांनी नाशिक महानगरपालिका आयुक्तांना पाठवलेल्या पत्रात नमूद केले आहे की, बी.डी.भालेकर शाळा ही नाशिकमधील अनेक पिढ्यांच्या शिक्षणाशी निगडित असलेली एक ऐतिहासिक व शैक्षणिक परंपरेची

ओळख आहे. गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांतील हजारो विद्यार्थ्यांनी या शाळेतून शिक्षण घेऊन समाजात स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. अशा शाळेची इमारत पाडून तेथे विश्रामगृह उभारणे म्हणजे शहराच्या शैक्षणिक वारशावर अन्याय करणारे पाऊल असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

शाळा काही कारणांमुळे बंद करण्यात आली असली तरी तिचे गंजमाळ,शालिमार,जुनेनाशिक,दूधबाजार, सारडा सर्कल आदी परिसरातील अत्यल्प उत्पन्न घटकांतील विद्यार्थ्यांसाठी बी. डी. भालेकर शाळा दीपस्तंभ आहे. शाळा फक्त संरक्षितच करू नये तर ती पुनर्जीवित करावी अशी माझी मागणी आहे. - राजाभाऊ वाजे, खासदार, नाशिक.ऐतिहासिक आणि सामाजिक महत्त्व अमूल्य आहे.

अशा ठिकाणी विश्रामगृह उभारणे हे जनतेच्या भावनांना धक्का देणारे आहे, असे खा. राजाभाऊ वाजे यांनी म्हटले आहे. त्या जागेचा उपयोग विद्यार्थ्यांसाठी, शैक्षणिक उपक्रमांसाठी किंवा सामाजिक उपयोगाच्या प्रकल्पासाठी करावा, हेच जनतेच्या हिताचे ठरेल, असेही त्यांनी पुढे

नमूद केले आहे. खा. वाजे यांनी पत्राद्वारे मनपाला आवाहन केले आहे की, बी. डी. भालेकर शाळेच्या इमारतीच्या जागेचा वापर विश्रामगृहासाठी न करता ती शैक्षणिक उद्देशासाठी राखून ठेवावी. तसेच, स्थानिक जनतेच्या मतांचा आदर करून कोणताही विकासप्रकल्प राबवावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे. दरम्यान, मनपा प्रशासनाकडून या विषयावर अद्याप अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.मात्र, शहरातील नागरिक, माजी विद्यार्थी आणि सामाजिक संघटनांकडूनही शाळेच्या इमारतीच्या संवर्धनाची मागणी जोर धरू लागली आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!