मदर तेरेसांचा पुतळा उभारावा.
श्रीरामपूर दिपक कदम श्रीरामपूर शहरात मोठ्या संख्येने ख्रिस्ती समाजाचे वास्तव्य आहे.ह्या समाजाचा शहराच्या जडणघडणीत मोलाचा वाटा आहे. मात्र,समाजासाठी समाजभवनाला जागा नाही. नगरपालिकेने ख्रिस्ती समाज मंदिरासाठी जागा द्यावी तसेच गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित असलेला संत मदर तेरसा यांचा पुतळा संतलूक हॉस्पिटल परिसरात बसवावा,अशी मागणी ख्रिस्ती समाजाच्या वतीने करण्यात आली आहे.
पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे यांना समाजाच्या वतीने एक निवेदन देण्यात आले असून त्यात म्हटले आहे की,शहरात ख्रिस्ती समाजाचे सुमारे हजारो नागरिक वास्तव्यास आहेत.या सर्व नागरिकांमध्ये सामाजिक, शैक्षणिक,सांस्कृतिक तसेच धार्मिक जागरूकतेसाठी विविध कार्यक्रम नियमितपणे घेतले जातात.मात्र, सद्यस्थितीत ख्रिस्ती समाजाकडे कोणतेही स्वतंत्र समाजभवन किंवा सामुदायिक सभागृह उपलब्ध नाही.
सामाजिक ऐक्य,शिक्षणवृद्धी,युवक व महिला सक्षमीकरण तसेच समाजातील दुर्बल घटकांसाठी शैक्षणिक व प्रशिक्षण उपक्रम राबविण्याकरिता स्वतंत्र समाजभवनाची अत्यंत गरज भासत आहे.श्रीरामपूर शहरात शासनाच्या जागेवर किंवा नगरपरिषदेच्या माध्यमातून ख्रिस्ती समाजभवन उभारण्यासाठी जागा व निधी मंजूर करावी.
या समाजभवनातून सर्व ख्रिस्ती बांधवांना शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक विकासासाठी मोठी मदत होईल व समाजातील एकोपा अधिक वृद्धिंगत होईल.तसेच श्रीरामपूर शहरातील संत लूक हॉस्पिटल
परिसरामध्ये अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या भारतरत्न संत मदर तेरेसा यांचा पुतळा बसविण्यात यावा असे लेखी निवेदन राष्ट्रीय अध्यक्ष अनिल भोसले व जिल्हाध्यक्ष दिपक कदम,पास्टर राजेश कर्डक पास्टर, सतीश आल्हाट, रवींद्र लोंढे, लेविन भोसले,संजय दुशिंग, संतोष गायकवाड, कमलाकर पंडित,विलास पठारे, प्रमोद शिंदे, विश्वरंजन मकासरे, व्ही. एस.कांबळे,संजय तोरणे, प्रकाश निकाळे,अजित सुडगे, निशिकांत पंडित, विश्वास अमोलिक, विकी त्रिभुवन, संदीप हिवाळे, विजय त्रिभुवन,संदीप साळवे,राजू साळवे,जेम्स पंडित,सुरेश ठुबे, राजकुमार सात्रळकर,संदिप दळवी, किशोर गायकवाड,भाऊसाहेब तोरणे,चंद्रकांत त्रिभुवन,संजय साळवे, सचिन रूपटक्के,लुकस दिवे आदींच्या निवेदनावर सह्या आहेत.
