पुणे प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य रायफल असोसिएनच्या (एमआरए )यांच्या वतीने ट्रॅप आणि डबल ट्रॅप या दोन्ही राज्यस्तरीय नेमबाजी स्पर्धाचेे आयोजन पालघर येथे करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये सिंगल ट्रॅपमध्ये आभिषेक पाटील याने प्रथम क्रमांक पटकावला,डबल ट्रॅप या स्पर्धेत प्रणव गुप्ता यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे.
विजयश्री प्राप्त झालेल्या या दोघांनी ही प्रसिध्द राष्ट्रीय स्तरावर ट्रॅप व डबल ट्रॅप स्पर्धेत उत्तम गुणांसह प्रथम स्थान पटकावले. तर कोल्हापूरच्या पृथ्वीराज महाडिक यांनी दुसरे स्थान मिळविले, तिसर्या क्रमांकावर पुण्याचा सिध्दार्थ पवार यांनी विजय मिळविला आहे.
