कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरातांचे विश्वासू सहकारी ॲड.समीन बागवान यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

Cityline Media
0

श्रीरामपूर दिपक कदम- अहिल्यानगर जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष,मा.महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व डॉ.सुधीर तांबे यांचे विश्वासू सहकारी ॲङ समिन बागवान यांनी काल पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव अविनाश आदिक यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीमध्ये आपल्या सहकाऱ्यांसह जाहीर प्रवेश केला.
गेल्या अनेक वर्षापासून कॉंग्रेस पक्षात् सक्रिय, एकनिष्ठ प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून ते कार्यरत होते.२०१९ व २०२४ च्या विधानसभा निवड नुकित सक्रिय सहभागी,
जाहीर सभामधून उत्कृष्ट मुद्देसूद मांडनी करुन काँग्रेसचे उमेदवार निवडून आणण्यातत्यांचा सिंहाचा वाटा होता.

 नगरपालिका निवडणुकीत पक्षश्रेष्टी कडून दखल न घेता अन्याय झाल्याने नाराज नाराज होते.पालकमंत्री विखे  व मा. खासदार डॉ. सुजय विखे यांनी भारतीय जनता पक्षाची दीन दलित,मुस्लिम-अल्पसंख्याक, शेतकरी यांच्या बाबतीत असणारी सर्व समावेशक भूमिका पसंत पड़ल्याने व भविष्यात अल्पसंख्याक समाजाचा असणारा विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी एक उत्तम समन्वयकाची भूमिका घेऊन वाटचाल करण्यासाठी तसेच आपल्या उच्च शिक्षणाचा फायदा कायदेशीर, सामाजिक,राजकीय व वैद्यकीय सेवा भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून मिळवुन देण्याचा मानस ठेऊन जाहीर प्रवेश केला.

या प्रसंगी राज्याचे जलसंपदा मंत्री पालक मंत्री राधाकृष्ण विखे यांनी ॲड बागवान यांच्या प्रवेशाबद्द्ल आंनद व्यक्त करुन निश्चित न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले.या प्रसंगी जिल्हाध्यक्ष नितिन दिनकर, दिपक पटारे,इंद्रनाथ पाटील थोरात,संजय फंड, श्रीनिवास बिहानी,रवि पाटील,केतन खोरे,आशिष धनवटे,नारायण डावखर, मुख़्तार शाह,नजीर मुलानी,महेबुब कुरैशी,हाजी इस्माइल,मोहसिन शेख,मेहबूब प्यारे,मुदस्सर शेख,तौफीक शेख,शरद नवले,अभिषेक खंडागळे,नाना शिंदे,नीतिन भागडे,दिपक चव्हाण,विराज भोसले,बंडु शिंदे,राहुल आठवाल आदी उपस्थित होते.या प्रसंगी समिन बागवान यांचे समवेत अनेक सहकाऱ्यानी जाहीर प्रवेश केला.

हा प्रवेश हा कॉंग्रेस पक्षासाठी धक्का समजला जात असून बागवान हे एक उत्कृष्ट वक्ते असून उत्तम संघटन कौशल्य व सामाजिक कार्यात सक्रिय असल्याने मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणावर पक्षा सोबत जोड़ला जाईल यात शंका नाही असे या प्रसंगी अनेक उपस्थितांनी बोलून दाखवले.ॲड बागवान यांच्या प्रवेशाने वार्ड नंबर दोन तसेच संजय नगर भागातील गणिते बदलणार असल्याचे सांगितले जात आहे.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!