झरेकाठी सोमनाथ डोळे,नेवासा तालुक्यातील सुरेगाव येथे नेवासा ,गंगापूर, वैजापूर या तीन तालुक्यातील धार्मिक स्थळा बरोबरच शेतकरी व वारकऱ्यांसाठी वरदान ठरणाऱ्या सुरेगाव ,बैल पांढरी, जैनपूर नेवासा ते नाऊर गाव येथील गोदावरी नदीवरील पुलाच्या कामांचे भूमिपूजन जलसंपदा तथा पालकमंत्री ना डॉ राधाकृष्ण विखे पा. यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.
नियोजित पूल व रस्ता हा विकासाचा राज्यमार्ग असल्याने पुलाच्या पैलतीरी औद्योगिक प्रकल्प उभारणीसाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही नामदार राधाकृष्ण विखे पा.यांनी यावेळी दिली
.
नेवासा बुद्रुक शिवारातील सुरेगाव रस्त्यावर असलेल्या श्री सदगुरु नारायण गिरी महाराज आश्रमामध्ये झालेल्या कार्यक्रम प्रसंगी महंत.उद्धव महाराज मंडलिक,महंत रमेशनंदागिरी महाराज, विश्वनाथ महाराज मंडलिक, अंकुश महाराज जगताप,शिर्डी विधानसभा खासदार, भाऊसाहेब वाकचौरे, आमदार विठलराव लंघे, आमदार रमेश बोरनारे, महंत उद्धव महाराज मंडलिक, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनी विखे ,भाजपचे जिल्हा अध्यक्ष नितीन दिनकर, किसन गडाख ,उद्योजक प्रभाकर शिंदे, अब्दुल शेख, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता विवेक माळुंदे, डॉ. किरण घुले कार्यकारी अभियंता युवराज कोकरे, सुरेश पाटील नागरे, किसन गडाख, सोमनाथ डोळे, जैनपुर ग्रामपंचायत मा. उपसरपंच भाऊ पाटील घुगे, जैनपुर सेवा सोसायटीचे अध्यक्ष बापू, डिके,व्यासपीठावर उपस्थित होते
उद्धव महाराज मंडलिक यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. गोदावरी नदीवर होणाऱ्या फुलामुळे पंचक्रोशील शेतकरी, विद्यार्थी, वारकरी यांच्यासाठी दळणवळण सुलभ होणार आहे, तसेच या तिन्ही तालुक्यातील लोकांना चाळीस किलोमीटरचे अंतर यामुळे कमी होणार असल्याचे.सांगून यासाठी नामदार विखे पा. यांनी दिलेला शब्द पाळून कृतीतून कामासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार मानले.
नामदार राधाकृष्ण विखे पा. म्हणाले की गोदावरी नदीवरील पुल व्हावा.हे मा.केंद्रीय मंत्री पद्मभूषण बाळासाहेब विखे पा. यांचे स्वप्न होते ते पूर्ण करण्याची भाग्य मला मिळाली हा.परिसर संतांची भूमी आहे त्यामुळे प्रवरा नदी तिरावरील नेवासा बुद्रुक ते ज्ञानेश्वर मंदिर तसेच देवगड ते गोधेगाव येथील पादचारी पुलाच्या कामासाठी निधी उपलब्ध करून देण्याचा.मी प्रयत्न करीन अशी ग्वाही दिली.
गोदावरी नदीवर रस्त्यासह पूल घेतला यामुळे संभाजीनगर व अहिल्यानगर हे दोन्ही जिल्हे समृद्धी महामार्गाला जोडले जाणार आहे. रस्ता हे विकासाचे मोठी साधन असल्याने परिसरातील विकास कामांना गती मिळेल.पुला सह रस्त्याच्या कामाला निधी उपलब्ध झाला असल्याने त्यामुळे चिंता नाही असे सांगून येथील तीर्थक्षेत्र विकास कामांसह रोजगाराला देखील चालना मिळणार असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.
पुलामुळे या भागातील जमीन ही औद्योगिक क्षेत्रासाठी कमी येणार असल्याने जमिनीसह.उद्योग आणण्यासाठी देखील आपण काम करू त्यामुळे खऱ्या अर्थाने औद्योगिक विकासामुळे विकासाचा राजा मार्ग येथे निर्माण होईल अशा विश्वास नामदार विखे पा. यांनी व्यक्त केला.
वैजापूरचे आमदार रमेश बोरनार म्हणाल,गोदावरी पुलामुळे वैजापूर,गंगापूर,नेवासा या तीन तालुक्याला जोडण्याची मोठी काम नामदार विखे पा. यांचे प्रयत्नाने झाली आहे तसेच उद्धवजी महाराजांची जन्मभूमी कर्मभूमी ही जोडण्याचे काम नामदार विखे पा. यांनी केली असल्याचे गौरवोदगार.काढले.
आमदार विठ्ठलराव लंघे म्हणाले की गोदावरी नदीवरील नियोजित पुल.हा मंत उद्धव महाराजांच्या प्रयत्नाने व नामदार राधाकृष्ण विखे पा. यांच्या पुढाकाराने मंजूर झाला आहे. दोन तीर्थक्षेत्र जोडणारा हा पूल नेवासा तालुक्यासाठी वरदान ठरणारे असल्याचे सांगून देवगड ते गोधेगाव पादाचारी फुलासाठी विखे पाटील यांनी निधी उपलब्ध करून देण्यासाठी तरतूद करावी अशी मागणी केली.
यावेळी सौ.विजया आंबाडे,अंकुश काळे डॉ. बाळासाहेब कोलते, रमेश नागरे ,बाबासाहेब गीते, सखाराम नागरे, दत्तू नागरे, बापू डिके, भाऊ पाटील घुगे, यांच्यासह गंगापूर, वैजापूर, नेवासा तालुका,व पंचक्रोशील शेतकरी नागरिक भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते,
