झरेकाठी सोमनाथ डोळे नेवासा तालुक्यातील जैनपुर येथील शिष्टमंडळ अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जलसंपद मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पा. यांना भेटून ऊस तोडणीसाठी पद्मश्री कारखान्यामार्फत बैलगाडी सेंटर मिळण्याबाबत निवेदन देण्यात आले.
दिलेल्या निवेदनामध्ये जैनपूर परिसरातील अतिवृष्टी झाली होती त्यामुळे ऊसाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे, तसेच शेतामध्ये पाणी आहे, पाणी असल्यामुळे ऊस तोडणी साठी बैल गाडी सेंटर,मिळण्यात यावी असे निवेदन ऊस उत्पादकांच्या वतीने देण्यात आले.
जैनपुर येथील शिष्टमंडळात जैनपुर सेवा सोसायटीचे अध्यक्ष बापूसाहेब डिके,जैनपुर ग्रामपंचायत मा. उपसरपंच भाऊ पाटील घुगे,जैनपुर ग्रामपंचायत सरपंच किशोर शिरसाठ,खळी येथील सामाजिक कार्यकर्ते सुरेश नागरे, भाजपा बूथ प्रमुख सोमनाथ डोळे,माजी सरपंच सुरेश डिके,
दीपक गव्हाणे, शिवाजी नागरे, दिलीप सांगळे, कालिदास डिके,किशोर डिके, सुनील डिके,दत्तू सांगळे,किरण डिके,कुमार डिके,कानिफनाथ डिके,दत्तू गीते अशोक सांगळे, सखाराम नागरे,रमेश नागरे,
दत्तू नागरे,बाबासाहेब गीते आदींसह परिसरातील शेतकरी ग्रामस्थ उपस्थित होते, नामदार राधाकृष्ण विखे पा. यांनी निवेदन घेऊन संबंधित मागण्या मार्गी लावू असे आश्वासन देण्यात आले.जैनपुर परिसरातील, शेतकऱ्यांनी, ग्रामस्थांनी मंत्री विखे पा.यांचे आभार व्यक्त करून अभिनंदन केले आहे
