अहिल्यानगर शहरात अवैध घरगुती गॅस सिलेंडर विक्री करणाऱ्याकडून १०,८५००० मुद्देमाल हस्तगत

Cityline Media
0
अहिल्यानगर प्रतिनिधी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना गुप्त खबऱ्यामार्फत,एक इसम विनापरवाना बेकायदेशीरित्या गॅस सिलेंडरच्या टाक्या पिकअप गाडी क्रमांक एम.एच.४२ बी.एफ. ७९८१ यामध्ये भरुन एम.आय.डी.सी.ते केडगांव बायपास जाणारे रस्त्याने जाणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी नुकतेच या आरोपीस मुद्सदेमालासह अटक केले.पोलिस निरीक्षक किरण कबाडी यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील सहाय्यक पोलिस निरीक्षक हरिष भोये,व पोलीस अंमलदार सुनिल पवार,गणेश धोत्रे,शाहिद शेख, अर्जुन बडे अशांचे पथक नेमुन त्या ठिकाणी जावुन खात्री करुन कारवाई करणे बाबत आवश्यक सुचना देवुन पथकास रवाना केले.

पथकाने तात्काळ कल्याण रोड चौफुला येथे सापळा रचुन थांबले असता एक पिकअप गाडी क्रमांक एम.एच.५२ बी.एफ. ७९८१ गाडी रोडने येत असतांना दिसुन आली.पथकाने सदर वाहनास थांबवुन त्यावरी चालकास त्याचे नांव गाव विचारले असता त्याने त्याचे नांव उमेश बाळासाहेब चांदगुडे वय - ३७ वर्षे रा.सुपा ता.बारामती, जि.पुणे असे असल्याचे सांगितले.

सदर इसमास त्यांच्या कब्जात मिळुन आलेल्या घरगुती गॅस टाक्या व त्याचे परवान्याबाबत विचारपुस करता त्याने त्यांच्याकडे कोणत्याही परवाना नसल्याचे सांगुन सदर गॅस टाक्या वाहनामधुन आणुन स्वतःचे आर्थिक फायद्या करीता कब्जात बाळगुन विनापरवाना विक्री करण्याकरीता नेत असल्याचे सांगितले.

पथकाने या ठिकाणावरुन ७,००,०० रुपये किंततीचीे एक पिकअप गाडी, २,८५,००० रुपये किमतीच्या एच. पी.गॅस कंपनीच्या घरगुती वापराच्या ११० भरलेल्या व रिकाम्या गॅस टाक्या असा एकुण १०,८५,००० रुपये किमतीची मुद्देमाल जप्त केला आहे.

ताब्यात घेतलेल्या आरोपींनी शासनाचा कोणत्याही प्रकारचा परवाना न घेता, एच.पी. गॅस कंपनीच्या भरलेल्या गॅस टाक्या स्वतःचे आर्थिक फायद्या करीता कब्जात बाळगुन विक्री करण्यासाठी आपल्या कब्जात बाळगतांना मिळुन आल्याने त्याचेविरुध्द कॉन्स्टेबल सुनिल विनायक पवार यांचे फिर्यादीवरुन तोफखाना पोलिस ठाण्यात. गु. र. नं. १०८१/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम बी.एन.एस. २०२३ चे कलम २८७, २८८2, सह जीवनावश्यक वस्तु कायदा १९५५ चे कलम ३, ७ सह एल पी जी (पुरवठा आणि वितरण नियमन) आदेश २००० चे कलम ३(२)(बी) सह गॅस सिलेंडर अधिनियम 2016 चे कलम ४३, ४५ ४६ सह स्फोटके अधिनियम १८८४ चे कलम ९(बी) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास तोफखाना पोलीस ठाणे करीत आहे.

सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली यावेळी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार उपस्थित होते

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!