समाजातील प्रत्येक घटक आरोग्यदृष्ट्या सक्षम झाला पाहिजे-शंकर गायकर

Cityline Media
0
ब्राह्मणवाडा येथे मोफत आरोग्य शिबिर उत्साहात

अकोले विशाल वाघचौरे तालुक्यातील ब्राह्मणवाडा येथे ग्रामपंचायत ब्राह्मणवाडा,अकोले तालुका मेडिकल असोसिएशन,मेडी कव्हर हॉस्पिटल संगमनेर व प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत आरोग्य शिबिर उत्साहात पार पडले झाले.या वेळी विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय सहमंत्री शंकर गायकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना “समाजातील प्रत्येक घटक आरोग्यदृष्ट्या सक्षम झाला पाहिजे; ग्रामपातळीवर आरोग्यसेवा पोहोचवणे ही काळाची गरज आहे” असे प्रतिपादन केले.
ग्रामस्तरावर आरोग्याविषयी जागृती वाढवण्यासाठी आरोग्य शिबिरे उपयुक्त ठरत असून, शालेय स्तरावर नियमित आरोग्य तपासणी शिबिरांमुळे आरोग्यदायी सवयींचा पाया मजबूत होतो,असेही त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमाला अकोलेचे पोलीस निरीक्षक मोहन बोरसे, उपसरपंच सुभाष गायकर,कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य सचिन आरोटे,रवींद्र हांडे, शिवाजी आरोटे, चंद्रकांत गोंदके, माजी सरपंच भारत आरोटे,डॉ. बाबासाहेब सोनवणे, डॉ.निलेश कडाळे, डॉ.हबीब शेख, डॉ. सतीश वाळुंज, प्रदीप भाटे आदी मान्यवर उपस्थित होते.

शिबिरात हृदयरोग तज्ञ डॉ.राहुल गुट्टे व मेंदू–मनके विकार तज्ञ डॉ. उदयकुमार बडे यांनी आरोग्याच्या दृष्टीने घ्यावयाच्या काळजीबाबत सखोल मार्गदर्शन केले. तसेच त्यांनी उपस्थितांच्या प्रश्नांना उत्तरे देत अत्यवस्थ रुग्णांवर तातडीच्या उपाययोजना कशा कराव्यात याचे प्रात्यक्षिकही दाखवून दिले.

कार्यक्रमाचे स्वागत उपसरपंच सुभाष गायकर यांनी केले. आभार भारत आरोटे यांनी मानले तर सूत्रसंचालन शिवाजी हांडे यांनी केले.या शिबिरात एकूण २४३ रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली.शिबिर यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य,आरोग्य कर्मचारी,आशा कार्यकर्त्या,अंगणवाडी सेविका व सह्याद्री विद्यालय,ब्राह्मणवाडा यांनी विशेष सहकार्य केले.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!