नाशिक दिनकर गायकवाड कळवण तालुक्यातील मोहबारी येथे कार्तिक पौर्णिमेनिमित्त श्री कार्तिक स्वामी यात्रोत्सव भक्तिभावाने आणि जल्लोषात पार पडला.पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावून श्री कार्तिक स्वामींच्या दर्शनाचा लाभ घेतला.या यात्रेचे खास वैशिष्ट्य म्हणजे सह्याद्रीच्या उंच कड्यावर वसलेले श्री कार्तिक स्वामी मंदिर,जे कळवण तालुक्यातील एकमेव असे अनोखे देवस्थान आहे. मंदिराजवळ असलेले स्वच्छ आणि थंड पाण्याचे कुंड वर्षभर भरलेले असते.चहु बाजूने परिसर हिरवाईने नटलेला असून डोंगराच्या पायथ्याशी असलेले श्री शिवलिंग तीर्थक्षेत्र व बेलाचे पवित्र झाड हे भाविकांचे
प्रमुख आकर्षण ठरले.यात्रेचे विशेष आकर्षण ठरलेली भव्य कुस्ती दंगल यावेळी प्रेक्षकांनी अक्षरशःडोळे भरून पाहिली. तुफानी आणि उत्कृष्ट कुस्तींचे जबरदस्त सामने रंगले. कुस्तीप्रेमींच्या उपस्थितीत झालेल्या या दंगलीत प्रथम क्रमांक किरण पवार (लखमापूर) यांनी तर द्वितीय क्रमांक भुरा भला (देवळाली कॅम्प) यांनी पटकावला.
यांच्यासह नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार, साक्री, मालेगाव, गुजरात, यासह विविध भागातून कुस्तीप्रेमींनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला होता. संपूर्ण कुस्ती स्पर्धा उत्साहात पार पडली. यात्रेदरम्यान कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता.
अभोणा पोलीस ठाण्याचे बबन पाटोळे, हवालदार गायकवाड, तुंगार, बाघेरे यांच्यासह इतर पोलीस कर्मचारी उपस्थित राहून त्यांनी जबाबदारीने काम पाहिले. यावेळी मा.पोलीस पाटील अर्जुन भोये, तुकाराम गावित,शाहू चव्हाण,सुनील भोये,रघुनाथ भोये,लक्ष्मण पवार,उत्तम भोये, संजय भोये,आत्माराम भोये, काशिनाथ गायकवाड,पंडित भोये,सुकदेव ठाकरे,सुरेश भोये, कांतीलाल भोये,सुभाष भोये,विजय चव्हाण,विठ्ठल अहिरे,अर्जुन ठाकरे,बाळू माळी,सोमनाथ बर्डे, रवींद्र बर्डे आदी उपस्थित होते.
