राहाता प्नतिनिधी तालुक्यातील बाभळेश्वर येथे नुकतेच दुग्धयोगी रावसाहेब नाथाजी म्हस्के यांच्या सहस्त्रचंद्रदर्शन सोहळ्याचा आणि कै.नाथाजी पा.म्हस्के यांच्या पुतळा अनावरणाचा भव्य सोहळा उत्साहात पार पडला.
या सोहळ्याला खासदार निलेश लंके,खासदार भाऊसाहेब वाकचौरे,नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे, तसेच दिंडोरीचे खासदार भास्कर भगरे हे मान्यवर प्रमुख उपस्थित होते.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी भूषविले.
कै. नाथाजी पा. म्हस्के यांच्या पुतळ्याचे अनावरण मा.मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते पार पडले या प्रसंगी सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले आणि सोहळ्याचे औचित्य साधत “शरदपर्व – सारथी अमृतरथाचे” या गौरवग्रंथाचे प्रकाशनही करण्यात आले.
रावसाहेब नाथाजी म्हस्के यांच्या कार्याचा गौरव देखील करण्यात आला.
प्रसंगी आमदार आशुतोष काळे,विधानपरिषदेचे मा.आमदार सुधीर तांबे, बिपिन कोल्हे, मा. आमदार भानुदास मुरकुटे,मा. आमदार दादाभाऊ कळमकर, प्रभावती घोगरे, सौ.शालिनी विखे तसेच विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संपूर्ण बाभळेश्वर गावाने या ऐतिहासिक सोहळ्याला मोठा प्रतिसाद दिला आणि म्हस्के परिवारावर शुभेच्छांचा वर्षाव केला.या सोहळ्याने बाभळेश्वरच्या सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहासात एक सुवर्ण पान जोडले गेले,अशी भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.
