नाशिक दिनकर गायकवाड सुरगाणा तालुक्यातील नवापूर या गावचा लोक सहभागातून गाव मूल्यांकन प्रक्रिया पीआरए कार्यक्रम उत्साहात पार पडला.
नवापूर या गावात एकूण ४५ घरे आहेत. या घरांना १००% एकाव रंग दिला. सर्व घरांचे १००% शोष खड्डे खोदून पूर्ण झाले आहे. सुशोभीकरण व बोलक्या भीती बनवल्या आहेत. गावाला सुंदर अशी कमान बनवली आहे, विशेष
गावाने पुढाकार घेऊन गावातील दारू बंद केली आहे. सदर सर्व कामे पूर्ण झाले, या मुळेच स्वदेत फाउंडेशन या गावात काम करण्यास सुरुवात करणार आहे. याप्रसंगी तहसीलदार रामजी राठोड, पोलिस निरीक्षक दवंगे, स्वदेस फाउंडेशनचे वरिष्ठ व्यवस्थापक विशाल वरुटे, तालुका व्यवस्थापक राजेंद्र गुंड, दिपक मोरे, रोहिदास भांगरे, सरपंच झंपाताई थोरात, ग्रामसेवक महाजन,रमेश थोरात आदी उपस्थित होते.
