सोशल नेटवर्किंगचा पुरेपूर वापर;एम टेक इंजिनिअर स्पर्धा परिक्षेतून केंद्रीय पोलिस उपनिरीक्षक पदी

Cityline Media
0
-केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात पोलीस उपनिरीक्षक पदी निवडीबद्दल गुणगौरव सोहळा उत्साहात
-जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी दर्शन आढाव यांची केंद्रीय परीक्षेत प्रेरणादायी गगन भरारी - मा.मंत्री बाळासाहेब थोरात
-पोलिस उपनिरीक्षक दर्शन आढाव वरिष्ठ अधिकारी पदाच्या टप्पा लवकर गाठेल-मा.आ.डॉ.सुधीर तांबे
अकोले संगमनेरचे भुषण दर्शन आढाव संविधान रक्षक-उत्कर्षा रुपवते 

संगमनेर नितीनचंद्र भालेराव अकोले सारख्या दुर्गम भागातील जिल्हा परिषद शाळेतील दर्शन आढाव या विद्यार्थ्याने केंद्रीय परीक्षेत स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून कुठल्याही ट्रेनिंग सेंटर अकॅडमी कोचिंग क्लासेसचा आधार न घेता केवळ युट्युब सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून केंद्रीय सशस्त्र पोलिस दलात पोलीस उपनिरीक्षक पद नुकतेच प्राप्त केल्याने समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरसह जनतेतून दर्शन आढाव यांचे कौतुक आणि अभिनंदन होत आहे.
उत्तुंग यश मिळवून गगन भरारी घेतल्याने उपनिरीक्षक आढाव यांची राजकीय क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी अभिनंदन केले.प्रतिकूल परिस्थितीवर मात करून अपार मेहनत व कष्ट घेऊन स्पर्धा परीक्षेत त्यांनी उत्कृष्ट यश संपादन केले आहे.ग्रामीण भागातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी दर्शन आढाव याचे यश प्रेरणा देणारे आहे.
केंद्रीय सशस्त्र पोलीस दल हे गृह मंत्रालयाच्या अधिकाराखाली असलेल्या भारतातील पाच सुरक्षा दलांच्या नामांकनाचा संदर्भ देते.त्यांची भूमिका प्रामुख्याने अंतर्गत धोक्यांपासून राष्ट्रीय हिताचे रक्षण करणे आहे.याच दलात पोलीस उपनिरीक्षक पदी दर्शन संदेश आढाव यांची निवड झाली.

भौतिक सुविधांचा अभाव असतानाही जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी संघर्ष करून स्पर्धा परीक्षेत मोठ्या प्रमाणात यश मिळवत आहे.कारण जिल्हा परिषद शाळेचा शिक्षणाचा दर्जा उंचावत आहे.जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी परिस्थितीशी संघर्ष करून शिक्षण घेत स्पर्धा परीक्षेत  यश मिळवत आहेत हि कौतुकास्पद बाब आहे.

दर्शन आढाव संगमनेर कॉलेजच्या एम.टेक इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याने केंद्रीय परीक्षेत मोठे यश संपादन केल्याने कमी वयात त्याला मोठी संधी प्राप्त झाली आहे.भविष्यात मोठा अधिकारी होण्याची संधी प्राप्त झाली आहे.हे सर्व काही राज्यघटनेमुळे मिळत असल्याची जाणीव ठेवून भावी काळात समाजाची व देशाची सेवा करण्याची मोठी जबाबदारी दर्शन वर आली आहे आणि तेव्हा ती जबाबदारी तो निश्चितपणे पार पाडेल असे अशी अपेक्षा व्यक्त केली.मा.महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मालपाणी लॉन्स संगमनेर येथे केंद्रीय सशस्त्र पोलीस दल पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल आयोजित गुण गौरव सोहळ्याप्रसंगी उत्कृष्ट कामगिरीचे कौतुक करत दर्शन आढाव यास भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
शाहू, फुले,आंबेडकरी चळवळीतील सामाजिक कार्यकर्ते संदेश आढाव यांचे चिरंजीव दर्शन आढाव यांची केंद्रीय सशस्त्र पोलीस दल पोलीस उपनिरीक्षक पदावर निवड झाल्याबद्दल मालपाणी लॉन्स,संगमनेर येथे त्याचा गुणगौरव सोहळा व नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते.

या सोहळ्यास कार्यक्रमाचे अध्यक्ष हिरालाल पगडाल होते.तर नाशिक  पदवीधर मतदार संघाचे मा.आमदार सुधीर तांबे,वंचित बहुजन आघाडीच्या राज्य प्रवक्त्या उत्कर्षा रुपवते,आंबेडकर चवळीतील ज्येष्ठ नेते सुधाकर रोहम,राजहंस दूध संघाचे संचालक माणिक यादव, सामाजिक कार्यकर्ते शरद थोरात, काँग्रेस अनीसुचित जाती विभाग जिल्हाध्यक्ष बंटी यादव प्रा.विकास जगताप,प्रा.रमेश चौधरी,प्रा.रवी चौधरी,नारायण खांडगे,अण्णासाहेब आढाव,भाऊसाहेब चौधरी,तान्हाजी आढाव,शांताराम कर्पे,विश्वनाथ आल्हाट,बापू रणधीर,संदेश आढाव,सौ.अनिता आढाव यांच्या सह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार व गुणगौरव सोहळा पार पडला.
कार्यक्रमात सुरुवातीला महापुरुषांच्या प्रतिमेचे पुष्प पूजन करून सुमधुर व प्रेरणादायी भीम गीतांनी सुरुवात झाली.लोक कलावंत गायक सोनू गायकवाड व गायिका योगिता रोकडे यांच्या भीम गीतांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.दर्शन आढाव याचा गुणगौरव व सत्कार सोहळा यशस्वी करण्यासाठी बंटी यादव,विनोद गायकवाड,सोनू गायकवाड बाळासाहेब बालोडे,एसएमबीटी महाविद्यालयाचे प्रमुख दशरथ वर्पे निलेश बागुल राहुल बागुल अशोक शिंदे सुनील ढगे विश्वजीत घोंगाणे, प्रसाद आढाव गणेश गोरडे यांच्यासह इतर कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!