बालदिनानिमित्त होणार सर्व सवंगड्याच्या गाठीभेटी
आश्वी संजय गायकवाड आपण पुन्हा भेटूया आपल्या शाळेत, आपल्या आठवणीत रमवु या स्नेहपूर्ण भावनेने संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने एक आगळावेगळा उपक्रम आयोजित केला आहे.शाळेच्या स्थापनेपासून आजतागायत शिक्षण घेतलेल्या सर्व माजी विद्यार्थ्यांसाठी “माजी विद्यार्थी स्नेहमेळावा” शुक्रवार,१४ नोव्हेंबरला बालदिनाचे औचित्य साधून मोठ्या उत्साहात साजरा करण्याचे आयोजन केले आहे.आयोजक समितीने माहिती देताना सांगितले की शुक्रवार, १४ नोव्हेंबर २०२५ सकाळी १०.०० वाजता जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, आश्वी खुर्द येथे या आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे .
आपल्या बालपणीच्या आठवणी स्नेह आणि प्रगतीचा संगम असलेल्या या स्नेहमेळाव्यात सर्व माजी विद्यार्थी,विद्यमान शिक्षकवर्ग, पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. या निमित्ताने शालेय जीवनातील आठवणी आणि अनुभव व्यक्त करण्यात येणार आहे.
कौलाघात शाळेच्या प्रगतीविषयी आपले विचार व्यक्त करावे तसेच बालदिन आणि माजी विद्यार्थी मेळावा यांचा संगम स्नेह, आठवणी आणि प्रेरणा निर्माण करेल,असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.
यावेळी आयोजकांनी आवाहन केले की या महत्त्वपूर्ण उपक्रमाचे आयोजन शाळा व्यवस्थापन समिती,मुख्याध्यापक व शिक्षकवर्ग तसेच सर्व माजी विद्यार्थी यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे.
