शेवगावात मुख्याध्यापक अशोक गिते यांचा सेवापुर्ती सोहळा उत्साहात
संगमनेर प्नतिनिधी तालुक्यातील शेडगाव येथील सहकार महर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात विद्यालयाचे मुख्याध्यापक अशोक नामदेव गीते हे ३१ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर निवृत्त झाले नुकताच त्यांच्या सेवापूर्ती समारंभाला आमदार सत्यजीत तांबे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
या प्रसंगी आमदार तांबे यांनी मुख्याध्यापक गिते याचा सत्कार करून त्यांच्या पुढील आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना त्यांनी गीते सरांबरोबरच्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, “सह्याद्री शाळेत शिकत असताना गीते सर मला इंग्रजी विषय शिकवायचे.त्या काळात त्यांनी दिलेले शिक्षण,संस्कार आणि प्रेरणा आजही मनात ताजे आहेत.”
पुढे बोलताना ते म्हणाले, “शिक्षक हे समाजाच्या जडणघडणीचे खरे शिल्पकार आहेत.त्यांच्या कार्याचा सन्मान पावलोपावली व्हायला हवा.” समाजनिर्मितीतील शिक्षकवर्गाच्या योगदानाबद्दल आमदार तांबे यांनी मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त केली.
