शिर्डी प्नतिनिधी एन.पी.व्हिजन फिल्म लवकरच घेऊन येत आहे प्रेमाचा नवीन अध्याय “दिल दा राज”एक भन्नाट मराठी आणि पंजाबी संगीताचा संगम,जो प्रेम,श्रद्धा आणि संस्कृती यांचं सुंदर चित्र उभं करतो!
या गाण्याचे निर्माते आहेत आबा निर्मळ,कॅमेरामन गौतम म्हस्के दिग्दर्शक प्रमोद पंडित सहनिर्माते ज्ञानदेव शिंदे असुन कलाकार नरसिंग टाक,दुर्गा बावके, प्रमोद पंडित यांनी उल्लेखनीय भुमिका निभावली आहे गाण्याचे लेखन आबा निर्मळ यांनी केले आहे.
नावात साधेपणा,आणि विचारात जबरदस्त क्रिएटिव्हिटी असणारे निर्माते आबा निर्मळ नोकरी करत असतानाही मनात कला जपणारा हा कलाकार, नेहमीच “काहीतरी वेगळं” देण्याच्या शोधात असतो.लोकांच्या भावना समजून घेणारा,टिमला एक कुटुंब मानणारा आणि कल्पनेला वास्तवात आणणारा निर्मात्या मधला निर्मळ हिरा अशी त्यांची ओळख राहिली आहे
त्यांच्या भन्नाट कल्पनेला जादूई रुप दिलंय दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते दिग्दर्शक प्रमोद पंडित यांनी जे आपल्या प्रत्येक फ्रेममध्ये भावना आणि सिनेमॅटिक सौंदर्याचा अचूक मेळ घालतात.
या गाण्यात मराठी संस्कृतीची गोडी आणि पंजाबी बीट्सचा तडका गुरुद्वाऱ्याच्या भक्तीभावात आणि मंदिराच्या शांतीतून उमलणारं प्रेम
