झरेकाठी शेतकऱ्यांची मागणी; संगमनेर तहसीलदारांना दिले निवेदन
झरेकाठी सोमनाथ डोळे संगमनेर तालुक्यातील झरेकाठी व इतरही गावातील काही शेतकऱ्यांना सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीचे अनुदान अध्यापही जमा झाले नाही त्यामुळे सदरची अनुदान तात्काळ जमा करण्यात यावी यासाठी संगमनेरच्या तहसीलदार धीरज मांजरे यांना नुकतेच शेतकऱ्यांनी मागणीचे निवेदन दिले.
दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे, की सप्टेंबर २०२५ रोजी अतिवृष्टी झाल्यामुळे शासनाने नुकसान भरपाई जाहीर केली होती. त्याप्रमाणे गावातील ग्रामपंचायत अधिकारी सहाय्य कृषी अधिकारी, व ग्राम महसूल अधिकारी यांनी शेतातील नुकसानीची पंचनामे केली होती.
त्याप्रमाणे अनेक शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे नुकसान भरपाई त्यांच्या बँक खात्यावर जमा झालेली आहे. परंतु काही शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे नुकसान भरपाई अजून पर्यंत मिळालेली नाही. या संदर्भात कृषी अधिकारी सचिन गायकवाड यांच्या वरील अधिकाऱ्यांना संपर्क केला असता त्यांनी आमच्याकडून सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असल्याचे सांगितले आहे.
त्यामुळे या संदर्भात महसूल विभागाशी संपर्क करावे असे सांगण्यात आले आहे, तसेच रब्बी अनुदान देखील खात्यावर जमा झालेली नाही, तरी या संदर्भात आपल्या स्तरावर कारवाई करून लवकरात लवकर अनुदान जमा होण्यासाठी अंमलबजांनी करावी अशी मागणी करण्यात आली आहे.
या निवेदनावर, निवेदनावर जनसेवा युवा मंचचे सदस्य, भाजपा बुथ प्रमुख, सोमनाथ डोळे,जनसेवा युवा मंच सदस्य.राहुल वाणी, शिवाजी वाकचौरे, बाळासाहेब वाणी, सुदाम वाकचौरे,अनिल वाणी, मधुकर नाईकवाडी,डॉ रमेश वाणी,गंगाधर वाणी, भाऊसाहेब डोळे, संजय वाणी, पोपट म्हंकाळे,आदी शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.
