वंचित बहुजन आघाडीत नाशिक मधील राजकीय दिग्गजांचा जाहीर प्रवेश

Cityline Media
0
रवी नागरे, सुनील इंगळे, सह असंख्य बहुजनांचा पक्ष प्रवेश 

नाशिक दिनकर गायकवाड वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड प्रकाश आंबेडकर यांच्या तत्वनिष्ठ राजकारणावर विश्वास ठेऊन नुकतेच नाशिक मधून जिल्हा अध्यक्ष चेतन गांगुर्डे यांच्या नेतृत्वात नाशिक मधून असंख्य दिग्गज नेतृत्वाने वंचित बहुजन आघाडी मध्ये पक्ष प्रवेश केला.
रवी नागरे यांच्या पक्ष प्रवेशाने नाशिकच्या राजकारणात भूकंप झाला आहे.अनेक आमदार खासदार यांच्या राजकीय यशात नागरे यांचा मोलाचा वाटा आहे. नाशिक मध्ये ओबीसी चेहरा मिळाल्याने वंचित बहुजन आघाडीचे वलयं नाशिक मध्ये वाढत आहे.तसेच मराठा समाजाचे नेते सुनील इंगळे पाटील यांनी देखील वंचित बहुजन आघाडी मध्ये प्रवेश केला.

सचिन रुपवते यांच्या  बरोबर जिल्हा परिषद सदस्य गणपत झोले, रिपाइंचे आठवले गटाचे त्रंबकेश्वरचे युवक तालुका अध्यक्ष यांनी देखील वंचित बहुजन आघाडी मध्ये जाहीर प्रवेश केला.त्याच बरोबर सुरेश कड  व वंचित बहुजन युवा आघाडी महानगरात राष्ट्रवादीचे युवा नेते दीपक नऊल,शब्बीर शेख,कलीम हंसन शहा,कैलास बेंडकुले,गणपत झोले, शाहरुख रियाज पठाण, राहुल लोंढे , साहेबराव पालवे, गौरव पालवे, रोशन थाठे,अमोल गांगुर्डे, आदिसह असंख्य बहुजन कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडी मध्ये प्रवेश केला. 

प्रसंगी बाळासाहेब आंबेडकर यांनी नाशिक जिल्ह्यात चांगले काम चालू आहे.असेच सक्रिय काम करून स्थानिक स्वराज्य संस्थेत विजयी व्हा! अश्या सदिच्छा दिल्या.या वेळी जिल्हाध्यक्ष चेतन गांगुर्डे, जिल्हा प्रवक्ते बाळासाहेब शिंदे,जेष्ठ नेते करुणासागर पगारे,संघटक सागर रिपोर्टे,

उपाध्यक्ष प्रशांत अहिरे महिला आघाडी अध्यक्ष उर्मिला गायकवाड, उत्तर महाराष्ट्र सदस्य पंडित नेटावते, युवक महानगर प्रमुख दीपक पगारे, युवा महासचिव युवराज मणेर,नाना तपासे उपाध्यक्ष,मनोज उबाळे उपाध्यक्ष,ज्ञानेश्वर वाहूळे सचिव ,त्रंबकेश्वर तालुका अध्यक्ष अरुण काशीद,युवा जिल्हा उपाध्यक्ष बाळा साहेब शेजवाळ, वाल्मिक गायकवाड,गोकुळ कडलक, सागर,साळवे,प्रशांत बाविस्कर आदी सह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.                छाया रेखांकन प्रकाश कदम 
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!