नाशिक दिनकर गायकवाड यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ मुख्यालयात छत्रपती संभाजीनगर विभागीय केंद्रांतर्गत कार्यरत असलेल्या अभ्यास केंद्र प्रतिनिधींसाठी दोन दिवसीय उद्बोधन कृतीसत्र नुकतेच झाले. या कृतीसत्र समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे होते.
व्यासपीठावर विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन, विद्यार्थी सेवा विभागाचे संचालक प्रा. प्रकाश देशमुख व छत्रपती संभाजीनगर विभागीय केंद्राचे
संचालक डॉ.नंदकुमार राठी होते.कृतीसत्र समारोपप्रसंगी बोलताना कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांनी प्रत्येक अभ्यास केंद्राचा गरज आणि संधी यावर आधारित स्वतंत्र कृती आराखडा तयार करण्यात येऊन त्यानुसार कार्य करण्यात यावे. त्यासाठी विद्यापीठ प्रत्येक अभ्यासकेंद्राच्या पाठीशी ठामपणे उभे आहे, असे आश्वासनदेखील त्यांनी दिले.
प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन यांनी विद्यार्थी प्रवेश व अभ्यासकेंद्र गुणवत्ता याविषयी विशेष मार्गदर्शन केले. छत्रपती संभाजीनगर विभागीय केंद्राचे संचालक डॉ. नंदकुमार राठी यांनी विभागीय केंद्राचा आढावा सादर केला. या कृतीसत्रात विविध शाखांमधील तज्ज्ञांनी संबंधित विषयांवर व्याख्याने दिली.
प्रभारी कुलसचिव तथा वित्त अधिकारी डॉ. गोविंद कतलाकुटे, विद्यार्थी सेवा विभागाचे संचालक प्रा. प्रकाश देशमुख (अभ्यासकेंद्र व्यवस्थापन), परीक्षा नियंत्रक भटूप्रसाद पाटील (परीक्षा विभाग कार्य), विजय अहिरराव (ग्रंथभांडार व वितरण कक्ष), प्रदीप सोनवणे (पोर्टलवरून अभ्यासकें द्रांना मिळणाऱ्या सुविधा) यांनी मार्गदर्शन केले. अभ्यासकेंद्रांच्या प्रतिनिधींसाठी सूचना, अडचणी आणि प्रश्न विचारण्यासाठी एक खुले सत्रदेखील घेण्यात आले. कार्यक्र माचे सूत्रसंचालन डॉ. पूनम वाघ यांनी केले. डॉ.दयानंद हत्तीअंबिरे व अक्षय गामणे यांनी आभार मानले.
