प्रियकराच्या मदतीने कट रचत विवाहितेनी लग्नाच्या सातव्या दिवशी केली पतीची हत्या

Cityline Media
0
लखनौ सिटीलाईन न्यूज नेटवर्क उत्तर प्रदेशातील बस्ती जिल्ह्यातील परसरामपूर पोलीस ठाणे हद्दीतील बेदीपूर गावात, एका नवविवाहित वधूने तिच्या प्रियकरासमवेत लग्नाच्या सातव्या दिवशी तिच्या पतीची हत्या केली.
                छाया रेखांकन-प्रकाश कदम 
मागील काही महिन्यांत उत्तर प्रदेशात प्रियकरांकडून पतींची हत्या केल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. त्यापैकी मेरठमधील सौरभ हत्याकांड अजूनही ताजे असतानाच बस्ती येथून अशीच एक घटना समोर आली आहे. लग्नाच्या अवघ्या सात दिवसांनी एका पत्नीने तिच्या प्रियकरासोबत कट रचून पतीची हत्या केल्याचे समोर आले आहे. बस्ती जिल्ह्यातील परश्रमपूर पोलीस ठाणे हद्दीतील बेदीपूरगावात ही घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार,मंदिरात तरुणावर गोळी झाडण्यात आली.या खळबळजनक घटनेत पोलिसांनी पत्नी आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे.या घटनेत सहभागी असलेल्या एका अल्पवयीन मुलालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हत्येत वापरलेले ३१५ बोरचे पिस्तूल आणि दुचाकी देखील जप्त करण्यात आली आहे.

पोलीस लाईनच्या सभागृहात एसपी अभिनंदन यांनी या घटनेचा खुलासा केला.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परसरामपूर पोलीस ठाणे परिसरातील बेदीपूर येथील रहिवासी असलेल्या अनीस (वय २७) याचा विवाह १३ नोव्हेंबर रोजी गोंडा जिल्ह्यातील खोडारे पोलीस स्टेशन परिसरातील वैयानमवा येथील रहिवासी रुक्सानासोबत झाला होता. रुक्सानाचे माहेरघर बस्ती जिल्ह्यातील गौर पोलीस ठाणे परिसरातील महुआदबार गावात आहे.

लग्नापूर्वीही तिचे तिच्या माहेरच्याच एक तरुण रिंकू कन्नौजियासोबत प्रेमसंबंध होते. रिंकू आणि रुक्साना लग्न करणार होते. दरम्यान, रुक्सानाच्या कुटुंबाने तिचे लग्न बेदीपूर येथील रहिवासी अनीससोबत ठरवले. लग्नानंतर अनीस आणि रुक्साना यांच्यात भांडण झाले.

रुक्साना आणि रिंकूचा लग्नाचा प्लॅन अयशस्वी झाल्यावर त्यांनी अनीसची हत्या करण्याचा कट रचला. रिंकूने बिहारहून पिस्तूल खरेदी केली. नियोजनानुसार, रुक्साना बेदीपूर येथील तिच्या सासरच्या घरातून तिच्या आईवडिलांच्या घरी परतली. नंतरच दुसऱ्या दिवशी रिंकू आणि एक अल्पवयीन गुन्हेगार दुचाकीवरून बेदीपूर येथे आले, त्यांनी अनीसवर मंदिरात गोळी झाडली आणि पळून गेले. पोलीस तपासात हत्येचा हेतू उघड झाल्यानंतर, रिंकू आणि रुक्सानाला त्यांच्या घरातून अटक करण्यात आली.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!