-आश्वी खुर्द जि.प.शाळेच्या स्नेहमेळाव्यात जेष्ठ नेते आण्णासाहेब भोसले यांचे आवाहन
-माजी विद्यार्थी विकास गायकवाड यांची ५१,००० रुपये शाळेला भरीव देणगी
आश्वी संजय गायकवाड बालदिनाचे औचित्य साधून संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथील जि.प.प्राथमिक शाळेत माजी विद्यार्थी मेळावा आयोजित आयोजित करण्यात आला होता.हा माजी विद्यार्थी स्नेहमेळावा जुन्या आठवणींचा आणि नव्या संकल्पांचा मिलाफ ठरला.या कार्यक्रमाला शाळेचे माजी विद्यार्थी आणि मा. जि.प. सदस्य आण्णासाहेब भोसले यांनी केलेले प्रभावी,हृदयस्पर्शी आणि प्रेरणादायी आवाहन विशेष लक्ष वेधून घेणारे ठरले.
प्रसंगी श्री भोसले म्हणाले की‘ही फक्त शाळा नाही, हे आमचे गुरुकुल!’आहे आणि हेच आमचे ज्ञानपीठ आहे
त्यांनी आपल्या भाषणातून शाळेप्रती व्यक्त केलेली कृतज्ञता उपस्थितांना भावनिक करत होती ही शाळा आमच्यासाठी फक्त शिक्षणाची जागा नव्हती; हे आमचे गुरुकुल होते.
या शाळेच्या पायरीवरून आम्ही मोठ्या जगात पाऊल टाकलं.आपल्या या मातीत संस्कारांची ताकद आहे आणि शिक्षकांच्या स्पर्शात माणूस घडवण्याची शक्ती आहे.आज आपण कुठल्याही उंचीवर पोहोचलो,त्याची पायाभरणी सर्व प्रथम इथेच झाली.
शाळेने पुढे आजच्या माजी विद्यार्थ्यांना सामूहिक जबाबदारीची जाणीव करून दिली. "आपल्या शाळेला परिसरातील ‘आदर्श व रोल मॉडेल’ शाळा बनवण्यासाठी माजी विद्यार्थ्यांनी पुढे आलेच पाहिजे.ही सामूहिक जबाबदारी आहे,असे कळकळीचे आवाहन श्री.भोसले यांनी केले.
शाळेचे माजी विद्यार्थी आणि भाऊ प्रतिष्ठानचे संस्थापक विकास गायकवाड यांनी यावेळी शाळेच्या विकासासाठी एकावन्न हजार रुपयेची भरीव देणगी जाहीर करून पुढाकार घेतला.त्यांच्या या सढळ हस्ते देणगीचे उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले.
विक्रम गायकवाड आणि संजय गायकवाड यांनीही शाळेसाठी हातात हात घालून काम करण्याचे आवाहन केले.सचिन शिंदे,राहुल गायकवाड,बाळा क्षिरसागर, सुमित गायकवाड, मंच्छींद्र गायकवाड,अतुल गायकवाड आणि संतोष गायकवाड यांनी शाळेच्या ऑफिससाठी फर्निचरचा टेबल देणगी म्हणून दिला.
मान्यवरांची उत्स्फूर्त उपस्थिती या स्नेहमेळाव्यात लक्षणीय होती आज समाजातील विविध क्षेत्रात कार्यरत असलेले माजी विद्यार्थी आणि इतर मान्यवर, जबाबदार नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यात मंत्री नामदार राधाकृष्ण विखे यांचे स्विय सहाय्यक बापुसाहेब गायकवाड,
सरपंच सौ.अलका गायकवाड,डॉ. दिनकर गायकवाड, मकरंद गुणे,माजी प्राचार्य जगदिश मुन्तोडे,पत्रकार श्रीरंग गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य सोपान सोनवणे शिक्षिका वर्षा दातीर राजश्री महामिने,शाळेच्या सेवानिवृत्त शिक्षिका सौ.शोभा गायकवाड, सौ.कदम,
स्कुल कमिटी अध्यक्षा सौ. प्रज्वली खरात, उपाध्यक्ष सागर भडकवाड तसेच संजय भोसले, सोमनाथ वाळेकर, सुनिल मांढरे काशिनाथ गायकवाड, संपत भोकरे, विमल गव्हाणे जया कांबळे सौ.ससाणे अमोल गायकवाड,राहुल भोकरे, अशोक भोसले, एकनाय मुन्तोडे विशाल गव्हाणे संदिप दातीर सचिन क्षिरसागर बाळासाहेब गायकवाड आदी माजी विद्यार्थी उत्स्फूर्तपणे या स्नेहमेळाव्यात उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका सौ.सविता भुसाळ-गायकवाड यांनी केले. त्यांनी माजी विद्यार्थी हा शाळेचा सर्वात मोठा भांडार असून, पुढील स्नेहमेळाव्याला अधिकाधिक माजी विद्यार्थी सहभागी व्हावेत,यासाठी प्रयत्न करण्याचे उद्दिष्ट स्पष्ट केले.
