कष्ट,गुणवत्ता व प्रामाणिकतेची राज्यस्तरावर दखल
आश्वी संजय गायकवाड संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द गावातून प्रशासकीय क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतलेले डॉ.वसंत गोपाळ माने यांना महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास व बहुजन कल्याण विभागात उपसचिव या महत्त्वपूर्ण पदावर पदोन्नती मिळाली आहे.
सामान्य प्रशासन विभागाने ८ डिसेंबर २०२५ रोजी जारी केलेल्या आदेशानुसार ही पदोन्नती जाहीर झाली असून, ही वार्ता केवळ डॉ.माने यांच्यासाठीच नव्हे तर संपूर्ण आश्वी खुर्द,संगमनेर तालुका व पंचक्रोशीसाठी अभिमानास्पद ठरली आहे.
ग्रामीण शाळेतून थेट मंत्रालय पर्यंतचा प्रेरणादायी प्रवास
डॉ. माने यांचा शैक्षणिक प्रवास अनेक तरुणांसाठी दिशादर्शक आहे.त्यांनी प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आश्वी खुर्द येथून,तर प्रवरा ग्रामिण शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यानिकेतन, आश्वी खुर्द येथून माध्यमिक शिक्षण पूर्ण केले.
लातूर येथे १२ वी (विज्ञान) पूर्ण केल्यानंतर त्यांनी परभणीच्या पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालयातून पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले.
याच काळात स्पर्धा परीक्षांची प्रेरणा घेत,कठोर परिश्रम, शिस्तबद्ध अभ्यास व ध्येयवेड यांच्या जोरावर त्यांनी २००९ साली महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एपीएमसी) राज्यसेवा परीक्षेत यश मिळवले आणि मंत्रालयीन सेवेत प्रवेश केला.
प्रशासकीय कारकीर्द : सातत्यपूर्ण गुणवत्तेची ओळख
कक्ष अधिकारी म्हणून प्रशासकीय प्रवास सुरू करणाऱ्या डॉ.माने यांनी प्रत्येक विभागात आपल्या कार्यशैलीची छटा उमटवली.
२००९–२०१६ : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागात उल्लेखनीय कामगिरी
२०१७–२०१८ : ग्रामविकास विभागात कक्ष अधिकारी
२०१९–२०२३ : पदोन्नतीने अवर सचिव, ग्रामविकास विभाग त्यानंतर : महसूल व वन विभागात प्रभावी व पारदर्शक कार्यसंभार
त्यांची अभ्यासू वृत्ती,तांत्रिक बाबींचे सखोल ज्ञान, निर्णयक्षम नेतृत्व व लोकाभिमुख दृष्टिकोन यामुळे प्रशासनात त्यांच्या कार्याची विशेष दखल घेतली गेली.
शिक्षित कुटुंबाची भक्कम पार्श्वभूमी : यशामागील प्रेरणास्थान
डॉ. वसंत माने यांच्या या यशामागे शिक्षण,शिस्त व सेवाभाव जपणारे कुटुंब हे मोठे बळ ठरले आहे.
त्यांचे वडील दिवंगत गोपाळराव विठ्ठलराव माने हे बी.व्ही.एस्सी शिक्षण घेतलेले असून, त्यांनी पाथर्डी व अकोले तालुक्यांत तसेच आश्वी खुर्द येथील जिल्हा परिषद पशुवैद्यकीय दवाखान्यात दीर्घकाळ पशुधन विकास अधिकारी म्हणून सेवा बजावली. पुढे कोपरगाव येथे पशुसंवर्धन विभागात सहआयुक्त या वरिष्ठ पदावर कार्य करून ते सन्मानाने निवृत्त झाले.
तसेच त्यांचे जेष्ठ बंधू डॉ. वसंतराव माने हे सध्या राहाता तहसील कार्यालयात महसूल सहाय्यक म्हणून कार्यरत असून, प्रशासकीय सेवेची परंपरा कुटुंबात अखंड सुरू आहे.
उपसचिव पदोन्नती : ग्रामीण प्रतिभेला मिळालेली दाद
डॉ. माने यांच्या प्रामाणिक सेवा, प्रशासकीय कौशल्य व लोकहिताच्या निर्णयक्षमतेची दखल घेत शासनाने त्यांना उपसचिव या जबाबदारीच्या पदावर पदोन्नत केले आहे. ही पदोन्नती केवळ वैयक्तिक यश नसून, ग्रामीण भागातून घडणाऱ्या गुणवत्तेला मिळालेली राज्यस्तरीय मान्यता आहे.
“कष्ट, चिकाटी आणि शिक्षणाच्या बळावर आयुष्य बदलता येते” याचे डॉ. वसंत गोपाळ माने यांचे जीवनप्रवास हे जिवंत उदाहरण आहे.
त्यांच्या या यशामुळे राज्याचे जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पा. माजी मंत्री आण्णा साहेब म्हस्के
युवानेते मा.खासदार डॉ. सुजय विखे मा. जि.प. अध्यक्षा सौ. शालिनी विखे पा. मा. जि.प. सदस्य आण्णासाहेब भोसले जिल्हा महिला भाजपा अध्यक्षा व मा.जि.प. सदस्या सौ. कांचन मांढरे बाळासाहेब मांढरे मकरंद गुणे बापुसाहेब गायकवाड ॲड. अनिल भोसले
डॉ.दिनकर गायकवाड सरपंच सौ. अलका गायकवाड उपसरपंच बाबा भवर ज्ञानेश्वर खर्डे कैलास गायकवाड संतोष भडकवाड बाबा भोसले विकास गायकवाड संजय भोसले सोपान सोनवणे अविनाश सोनवणे निलेश भवर विजय भोसले सागर भडकवाड तसेच आश्वी खुर्दसह संपूर्ण पंचक्रोशीतील ग्रामस्थ, विद्यार्थी व तरुणांनी अभिनंदन केले.
