यशवंत मंडईच्या जागी प्रस्तावित बहुमजली वाहनतळ;फेरनिविदा

Cityline Media
0
नाशिक दिनकर गायकवाड शहरात दिवसेंदिवस वाढणारी वाहने,त्यामुळे निर्माण झालेल्या पार्किंगची समस्या दूर व्हावी म्हणून महानगरपालिकेने रविवार करंजा येथील यशवंत मंडईच्या जागी प्रस्तावित बहुमजली वाहनतळ प्रस्तावित केला आहे. या प्रकल्पासाठी मागील महिन्यात मागविलेल्या निविदेला पुरेसा प्रतिसाद न मिळाल्याने पुन्हा एकदा निविदा प्रसिद्ध केली आहे.
शिंदे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी हा बहुमजली वाहनतळ महापालिकेने स्वनिधीतून अथवा राज्य सरकारच्या मदतीने उभारावा अशी भूमिका घेतल्यानंतर शिंदेसेनेचेच शिक्षणमंत्री दादा भुसे यांनीही खासगी तत्त्वावर वाहनतळाला विरोध दर्शविताना या वाहनतळाबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करणार असल्याचे म्हटले होते.

मात्र, महापालिका प्रशासन हा वाहनतळ खासगीकरणातून उभारण्यावर ठाम असून, पहिल्या टेंडरला अत्यल्प प्रतिसाद

मिळाल्याने आता दुसऱ्यांदा निविदा प्रसिद्ध केले आहे. नाशिक स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनी लिमिटेडने पंचवटीत सीता गुंफा आणि यशवंत मंडई परिसरात यांत्रिक पार्किंग प्रकल्प प्रस्तावित केले होते. त्या प्रकल्पांच्या टेंडर प्रक्रियेला मिळालेला अपुरा प्रतिसाद व इतर तांत्रिक कारणांमुळे ते पार्किंग प्रकल्प रखडले होते.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!