महापरिनिर्वाण दिनी गॉड्स असेंबल मिनिस्ट्रीच्या वतीने कनोलीत रक्तदान शिबिर उत्साहात

Cityline Media
0
संगमनेर प्रतिनिधी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून संगमनेर तालुक्यातील कनोली येथील गॉड्स असेंबल मिनिस्ट्री या संस्थेने सालाबादप्रमाणे रक्तदान शिबीर ही अनोखी व जीवनदायनी परंपरा निरंतर ठेवली.
प्रसंगी नाशिक येथील समता ब्लड बँक पथक मुख्य मयूर सदावर्ते,जीवन जाधव, इतर सहकारी, नाशिक फाउंडर डॉ.इरफान आणि या उपक्रमाचे  आयोजक गॉड्स असेंबल मिनिस्ट्री अध्यक्षा सौ.उज्वला जगताप ,सहाय्यक डॉ. भूषण देसले, सामाजिक कार्यकर्ते मच्छिंद्र जगताप यांनी अतिशय सुरेख  नियोजन करून हे शिबिर पार पडले. 

रक्तदान शिबिर म्हणजे लोकांना एकत्र आणून रक्तदान करण्यासाठी प्रोत्साहित केले, येथे आरोग्य तपासणी, नोंदणी आणि रक्त संकलनाची प्रक्रिया केली,ज्यामुळे गरजू रुग्णांना जीवनदान मिळत आणि रक्तदात्याला आरोग्याचे अनेक फायदे मिळतात जसे की रोग प्रतिकारशक्ती वाढणे आणि लोहाचे प्रमाण नियंत्रित राहणे. 

या शिबिरांमध्ये स्वयंसेवक आणि संस्था महत्त्वाची भूमिका बजावली रक्तदान शिबिराची प्रक्रिया:नोंदणी आणि समुपदेशन: रक्तदान करणाऱ्या व्यक्तीची आवश्यक माहिती घेतली आणि आरोग्य सल्ला यावेळी दिला.आणि आरोग्य तपासणी, रक्तदात्याची योग्यता तपासण्यासाठी हिमोग्लोबिन, रक्तगट आणि इतर आरोग्य चाचण्या केल्या.

रक्त संकलन साधारणपणे १ पिंट (सुमारे ३५०-४५० मिली) रक्त गोळा केले जाते आणि चाचणीसाठी काही नमुने यावेळी घेतले.आरोग्य फायदे नियमित रक्तदान केल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो,शरीरातील अतिरिक्त लोह कमी होते आणि नवीन रक्तपेशी तयार होण्यास मदत होते.असे यावेळी पथकाच्या मार्फत सांगण्यात आले.

रक्तदानाचे महत्त्व जीवनदान आणि आपत्कालीन परिस्थितीत किंवा नियमित उपचारांसाठी रक्ताची गरज असलेल्या रुग्णांसाठी रक्तदान जीवनदायी ठरते व गरजेला वेळेत उपलब्ध ही होते असे आवाहनात्मक सांगण्यात आले. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून या  निमित्ताने रक्तदानाचे महत्त्व आणि गरज याबद्दल जागरूकता पसरवली.सुरक्षितता ऐच्छिक, विनामोबदला रक्तदान हे सर्वात सुरक्षित मानले जाते,जे गॉड्स असेंबल मिनिस्ट्रीच्या शिबिरांमधून सांगण्यात आले.

यावेळी खूप मोठ्या प्रमाणात महिला व पुरुषांनी रक्तदानाचे महत्त्व समजून घेऊन रक्तदान केले.
प्रसंगी मोठ्या प्रमाणात महिला व पुरुष  त्यांनी त्यांच्या मोफत रक्ताच्या तपासण्या केल्या.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!