महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या गुटखा विक्री करणाऱ्या व्यक्तीस अटक

Cityline Media
0


नाशिक दिनकर गायकवाड प्रतिबंधित गुटख्याची साठवणूक करून विक्री करणाऱ्या इसमाविरुद्ध कारवाई करून त्याला अटक करण्यात आली आहे.
याबाबत अन्न व औषध प्रशासन विभागाचे अन सुरक्षा अधिकारी गोपाल विजय कासार यांनी गंगापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले, की आरोपी इस्माईल रशीद शेख (रा. स्वारबाबानगर, सातपूर) हा नुकताच दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास जिल्हा परिषदेच्या मुख्य 

गेटच्या बाजूला ५२६ रुपये किमतीच्या वाह पानमसाला, राजनिवास सुगंधित पानमसाला, जाफरानी जर्दा, केशरयुक्त विमल पानमसाला या महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या व आरोग्यास अपायकारक असलेल्या अन्नपदार्थांची विक्रीसाठी साठवणूक, विक्री, वाहतूक करताना आढळून आला.

या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात इस्माईल शेख विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला अटक करण्यात आली आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!