सोनई हॉटेल चालकास मारहाण प्रकरणातील आरोपी 'शेंग्या'अखेर स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद

Cityline Media
0
नेवासा प्नतिनिधी तालुक्यातील सोनईतील दत्तनगर येथील फिर्यादी लक्ष्मण गंगाधर जगधळे (वय - ३८) हे हॉटेलवर काम करत असतांना आरोपी शेंग्या उर्फे अशोक गजभिव (वय २१)सनी किसन शिंदे हे दोघे मोटार सायकलवर येवुन आरोपी फिर्यादीचे धनश्री हॉटेलचे गल्यातुन २७,००० रुपये बळजबरीने काढुन घेतल्याने फिर्यादीने  विरोध केला असता आरोपी शेंग्याने त्याचे हातातील धारदार चाकुने पोटावर,आरोपी सचिन मोहन काकडे याने त्याचे हातातील धारदार चाकुने फिर्यादीचे डावे बरगडीजवळ,आरोपी आकाश मोहन काकडे याने त्याचे हातातील कत्तीने फिर्यादीचे गळ्याजवळ डावे बाजुस जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने वार करुन फिर्यादीस जखमी केले आहे.
सोनई गावातील माजी सरपंच आरोपी दादासाहेब वैरागर याने फिर्यादीस मागील दहा ते पंधरा दिवासापासुन तु खुप आमचे समाजाच्या विरोधात भाषणे करतो.तुला दहा पंधरा दिवसात तुझा गेम होणार आहे तु बघ असा दम दिला व आरोपी दादासाहेब वैरागर याने आरोपी 

सौरभ उर्फ शेंग्या गजभिव, आकाश मोहन काकडे, सचिन मोहन काकडे जेकब अँथनी साळवे,सनी किसन शिंदे यांनी फिर्यादीला मारण्याची सुपारी देवुन फिर्यादीला जिवे ठार मारण्याचा कट रचला आहे वगैरे मजकुरचे फिर्यादीवरुन सोनई पोलीस ठाणे गु.र.नं. ४५५/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३११,६१
(२),३५१(२)(३) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये झालेल्या घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणणे बाबत सुचना दिले होते.

सुचनेनुसार पोलिस निरीक्षक किरण कबाडी यांनी हा गुन्हा उघडकीस आणणेकरीता स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक हरिष भोये व पोलीस अंमलदार सुरेश माळी, सोमनाथ झांबरे,बाळासाहेब नागरगोजे,आकाश काळे, किशोर शिरसाठ,बाळासाहेब खेडकर,चालक चंद्रकांत कुसळकर यांचे पथक तयार करुन आरोपीचे शोध घेवुन गुन्हा उघडकीस आणणे बाबत पथकास सुचना व मार्गदर्शन करुन पथकास रवाना केले होते.

पथकाने या गुन्ह्यातील आरोपी नामे सौरभ उर्फ शेग्या अशोक गजभिव  याचा व्यवसायिक कौशल्याचा वापर करुन आरोपीचे माहिती काढत असतांना,पथकास  आरोपी हा घोडेगाव शइवारात चांदा रोड येथे येणार असल्याची माहिती मिळाली.

पथकाने तात्काळ घोडेगांव शिवारात चांदा रोड येथे सापळा लावुन त्यास शिताफिने ताब्यात घेवुन त्याचे नांव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नांव १) सौरभ उर्फ शेंग्या अशोक गजभिव वय - २१ वर्षे रा. राजवाडा, सोनई ता.नेवासा जि. अहिल्यानगर असे असल्याचे सांगितले.

त्यास सदर गुन्ह्याबाबत विचारपुस केली असता त्याने सदर गुन्हा केल्याची कबुली दिली असुन त्यास हा गुन्ह्या करतांना सोबत कोण कोण होते याबाबत विचारपुस करता त्याने हा गुन्हा हा मी तसेच २) आकाश मोहन काकडे, ३) सचिन मोहन काकडे, ४) जेकब अँन्थनी साळवे, ५) सनि किसन शिंदे, ६) दादासाहेब वैरागर सर्व रा.सोनई ता.नेवसा जि. अहिल्यानगर अशांनी मिळुन केला असल्याचे सांगितले आहे.

नमुद आरोपीस सोनई पोलीस ठाणे गु.र.नं. ४५५/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३११,६१ (२), ३५१(२)(३) प्रमाणे दाखल गुन्ह्याचे तपासकामी हजर करण्यात आले असुन,पुढील तपास सोनई  पोलीस ठाणे करीत आहेत.जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी ही कारवाई केली.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!